38% Voting in four hours in Mawla
38% Voting in four hours in Mawla 
पिंपरी-चिंचवड

Pune Gram Panchayat Election Live Updates : मावळात चार तासात ३८ टक्के मतदान        

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या ३१६ जागांसाठी सकाळपासून अतिशय उत्साहात मतदान सुरु आहे. पहिल्या चार तासात ३८.४७ टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु असल्याची माहिती नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायतींची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली आहे. इतर अनेक ग्रामपंचायतींमधील अनेक जागाही बिनविरोध झाल्या आहेत. एकूण  ५१५ जागांपैकी १९९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींच्या ३१६ जागांसाठी ७१० उमेदवार रिंगणात आहेत. या जागांसाठी १५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली.

Pune Gram Panchayat Election Live Updates : दुसऱ्या टप्प्यात आघाडी घेत भोरमध्ये 39.63 % मतदान 

पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग कमी होता. या कालावधीत १५.६७ टक्के मतदानाची नोंद झाली होती. नंतर मोठ्या संखेने मतदार मतदानासाठी बाहेर पडले. साडे अकरा वाजेपर्यंत १७ हजार ८०० पुरुष व १३ हजार ९४१ महिला अशा एकूण ३१ हजार ७४१ ( ३८.४७ टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ग्रामीण भागात अतिशय उत्साहाचे वातावरण दिसून आले.

खांड, गोवित्री, ताजे, खांडशी, तिकोना, वारू, येळसे, बऊर, थुगाव व आढले खुर्द या ग्रामपंचायतीत ५० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली आहे. इतर १६ गावांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरु आहे. संवेदशील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT