381 cylinder seized, 22 arrested in Action against domestic gas cylinder thieves in old sangvi
381 cylinder seized, 22 arrested in Action against domestic gas cylinder thieves in old sangvi 
पिंपरी-चिंचवड

Video : मोठी कारवाई : सांगवी पोलिस स्टेशन झालं गॅस सिलिंडर गोडाऊन; 22 जण ताब्यात  

रमेश मोरे

जुनी सांगवी : घरगुती गॅस सिलिंडर लवकर संपतो कसा? ही गृहिणींची ओरड सुरु असते. त्यातच वजन न करता गॅस चोरी करुन वितरण करणारे सिलिंडर देऊन नागरीकांची लूट करतात. घरगुती गॅस सिलिंडर चोरणाऱ्यांच्या टोळीवर आज मोठी कारवाई करत ताब्यात घेण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर सामाजिक सुरक्षा पथकाकडून ही कारवाई करण्यात आली.या कारवाईनंतर सांगवी पोलिस ठाण्याला चक्क गॅस गोडाऊनचे स्वरूप आले आहे.  कारण  या कारवाईमध्ये रिकामे आणि भरलेले असे तब्बल ३८१ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचं समोर आले आहे. जवळापास पंचवीस लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एकूण 22 जणांना ताब्यात घेतले असून ही कारवाई सांगवी परिसरात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिस आयुक्तांनी सांगवी पोलिस ठाण्यात भेट देत या कारवाई बाबत खुलासा करुन माहिती दिली.

आणखी वाचा - पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार

मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलिंडर नेऊन तिथे कनेक्टरच्या सहाय्याने एका सिलिंडरमधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे. पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे. हे सर्व सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी आहेत. त्यांच्याकडून १४ टेम्पोमध्ये रिकामे आणि भरलेले असे तब्बल ३८१ गॅस सिलिंडर सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतले. आहेत. पोलिस आयुक्तांसमोर या महाभागांनी पाईपद्वारे भरलेल्या गॅस सिलेंडरमधून दूसऱ्या टाकीत चोरीचे प्रात्यक्षिकही दाखवले. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, व पथकाने केली. 

यावेळी बोलताना पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, ''नागरीकांच्या सुचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे चोरी व नागरीकांची लूट होत असताना संबंधित एजन्सी मालक चालकांना याची माहिती नव्हती का? हे काम अतिशय धोकादायक असून एखादी मोठी दुर्घटनाही घडू शकते. पोलिस कारवाई सुरु असून यावर कठोर कारवाई करण्यात येईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT