_111420060_gettyimages-1210554614.jpg 
पिंपरी-चिंचवड

मावळातील ४० टक्के रुग्णांची कोरोनावर मात                      

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात बुधवारी तळेगाव येथील दोन तर खंडाळा, कामशेत, ब्राम्हणवाडी, देवले व साई येथील प्रत्येकी एक अशा एकूण सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६२ झाली आहे.

दरम्यान, त्यात शहरी भागातील ९५ तर ग्रामीण भागातील १६७ जणांचा समावेश आहे. तळेगावात सर्वाधिक ६९, लोणावळा येथे १८ तर वडगाव येथे रुग्ण संख्या आठ झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून ९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची टक्केवारी सुमारे ४० टक्के एवढी आहे. सध्या सक्रिय असलेल्या १५८ रुग्णांपैकी ८२ जण लक्षणे असलेले तर ७६ जण लक्षणे नसलेले आहेत. लक्षणे असलेल्या ८२ जणांपैकी ६७ जणांमध्ये सौम्य स्वरूपाची तर १२ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. तीन जण अत्यवस्थ आहेत. सध्या ११७ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असून ४१ जण गृहविलगीकरणात असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

Editied by : sagar shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT