पिंपरी-चिंचवड

Video : सरकारने आमचा अंत पाहू नये; संयम सुटल्यास आम्हीही...

सुवर्णा नवले

पिंपरी : "हाताला काम नाही. पोटभर अन्न नाही. लेकरांची उपासमार सुरू आहे," अशा कठीण प्रसंगात सापडलेल्या तब्बल आठशे परप्रांतीयांना आपल्या मूळगावी परतायचे आहे. त्यांना अद्यापपर्यंत त्याच्या राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे हतबल झालेल्या या परप्रांतीयांनी 'आम्हांला आमच्या गावी जाऊ द्या', अशी आर्त विनवणी आपापल्या राज्य सरकारकडे केली आहे.

ओडिसा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, राजस्थान या राज्यातील हे परप्रांतीय काळेवाडी, थेरगाव व वाकड परिसरात विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. या सर्वांनी गावी परतण्यासाठी दहा दिवसांपूर्वी  https://covid19.mhpolice.in/ या वेबसाइटवर नोंदणी केली आहे. त्यासाठी प्रत्येकांनी खटाटोप करून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले. सलग आठ दिवस अन्नपाण्याविना या अशिक्षित मजूरांनी नोंदणीसाठी पोलिस ठाण्याचे उंबरठे झिजविले.

बिहार येथील समीर बेहरा म्हणाले, "रेशनचे धान्यदेखील आम्हाला दोन महिन्यांत मिळाले नाही. कित्येकदा रेशन दुकानाच्या रांगेतून माघारी आलो आहे. सध्या उपाशीपोटी झोपण्याची वेळ येत आहे. सरकारने अंत पाहू नये. संयम सुटल्यास आम्हीदेखील चालत गावाला निघू. प्रवासात कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून येथील नागरिकांनी आम्हाला थांबवून ठेवले आहे." 

ओडिसा येथील कटक जिल्ह्यातील संजय साहू म्हणाले, "लॉकडाउनपासून आमची परिस्थिती बिकट झाली आहे. घर कसेबसे चालवतोय. सरकारकडून अजून कोणतीही मान्यता मिळालेली नाही. पोलिस ठाण्यातही जाऊन आलो. वैद्यकीय प्रमाणपत्रही मिळविले. दोन महिन्याचे घर भाडे थकले आहे. शासकीय कार्यालयात विचारणा केली असता, रोज एकच सांगितले जाते, की तुम्हाला गावी पाठविण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे."

बिहारमधील चंद्रबनी शहा म्हणाल्या, "रेल्वे सुरू नाहीत. खिशात पैसा नाही. सरकार म्हणतेय घरात बसा. निदान आमच्या गावी तरी जाऊ. कुटुंबासोबत राहू. उपाशीपोटी मुलाबाळांची किती दिवस समजूत आम्ही काढणार. रोज मुलांना भात शिजवून घालतोय. काळभैरवनाथ उत्सव समितीचे शार्दूल पेंढारकर म्हणाले, "आम्ही या स्थलांतरित नागरिकांना गावी जाण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरून दिले आहेत. टोकन मिळाले आहेत. खासगी वाहनानेदेखील हे घरी जाऊ शकत नाही. इतकी बिकट परिस्थिती आहे. पायी जाऊन यांचे हाल होऊ नयेत, म्हणून यांना थांबून ठेवले आहे. सरकारने यांची त्वरित सोय करावी एवढीच विनंती आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणीचा ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा झाला की नाही, कसं तपासायचं? वाचा...

Nagraj Manjule : 'एका हयातीत शिवाजी महाराजांनी केलेलं काम एका चित्रपटात मांडणं अशक्य'; असं का म्हणाले दिग्दर्शक नागराज मंजुळे?

सायली-अर्जुन देणार गुडन्यूज? ठरलं तर मग मालिकेत भन्नाट ट्वीस्ट! बाळाच्या विचारात सायलीचं अर्जुनसाठी खास पत्र

Nepal Protest : नेपाळमध्ये हिंसाचार सुरुच, भारतीय बसवर हल्ला करत प्रवाशांना लुटले; जखमींना एअर अ‍ॅम्ब्युलन्सने दिल्लीत आणले

Sakal Newspaper Ranking: ‘सकाळ’ देशात ‘टॉप टेन’मध्ये, वर्तमानपत्रांनी नोंदविली २.७७ टक्क्यांची वाढ

SCROLL FOR NEXT