CoronaVirus 
पिंपरी-चिंचवड

लोणावळ्यात कोविड महासर्वेक्षण दुसऱ्या टप्प्यात ८१ 'पाॅझिटीव्ह'

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - लोणावळ्यात सध्या सुरु असलेल्या कोविड महासर्वेक्षण अभियानअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात ८१ रुग्ण आढळले. नगरपरिषदेच्या वतीने एका दिवसात ४५४ संशयित रुग्णांचे नमुणे तपासण्यात आले. कोरोनाचा उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने कोविड नियंत्रण, मृत्युदर रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी' कोविड मुक्त महाराष्ट्र ही अभियान राज्यभरात सुरु आहे. नगरपरिषदेने सक्रीय सहभाग घेतला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, आशा वर्कर, शिक्षक, स्वयंसेवी संस्था, आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी जवळपास सहाशे स्वयंसेवकांच्या मदतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. पहील्या टप्प्यात नगरपरिषद हद्दीत ४० हजार २०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती.

दुसऱ्या टप्प्यात शहरातील कोरोनाचे हाॅट स्पाॅट असलेल्या भागात नागरिकांची ऑक्सीमिटर, टेम्परेचर गणच्या सहाय्याने तपासणी झाली. सहव्याधी असलेल्या रुग्णांचीही नोंद घेण्यात आली. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवी पवार आदींनी उपस्थिती लावत नागरिकांना आवाहन केले. झालावाडी कोविड केअर सेंटर येथील स्वॅब कलेक्शन सेंटरमध्ये १५२ पैकी ४४, रामनगर, भुशी येथे १०० पैकी ५, भांगरवाडी शाळा येथे ६५ पैकी १२, खंडाळा शाळा येथे १३७ पैकी २०  अशा संशयित रुग्णांची टेस्ट पाॅझिटीव्ह आली.

खासगी हाॅटेल्समध्ये कोरोना रुग्णांची सोय
लोणावळा परिसरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. नगरपरिषद हद्दीत झालावाडी कोविड केअर सेंटरसह संजिवनी रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतात. वाघाड सॅनोटोरीयम, समुद्रा मेरीटाईम इन्स्टिट्युटमध्ये सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना ठेवण्यात येत आहे. भविष्यात रुग्णांची अडचण होऊ नये यासाठी शहरातील काही हाॅटेल्स ताब्यात घेत त्यात रुग्णांची सोय करण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT