Ajit Pawar absent for marathi natya sammelan Sharad Pawar CM Eknath shinde politics news  
पिंपरी-चिंचवड

Ajit Pawar : अजितदादांनी शरद पवार असलेल्या कार्यक्रमाला जाणं टाळलं! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनवी कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचे म्हटले होते. मात्र आजच्या पिंपरी येथील कार्यक्रमाला ते उपस्थित राहाणार होते.

रोहित कणसे

शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनवी कालच्या पुण्यातील नाट्य संमेलनाच्या उद्घाटनाचे आपल्याला निमंत्रण मिळालं नसल्याचे म्हटले होते. मात्र आजच्या पिंपरी येथील कार्यक्रमाला ते उपस्थित राहाणार होते. त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमात देखील याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसणार अशी चर्चा सुरू होती, मात्र अजित पवारांनी या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहण्याचे टाळले आहे.

पिंपरीतील नाट्य संमेलन उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे एका मंचावर एकत्र उपस्थित होते. अजित पवारांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार असल्याचे कळवले होते, मात्र ते ऐनवेळी या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. तसेच मंचावर त्यांच्यासाठी राखीव खुर्ची देखील ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत हे जवळपास निश्चित झाले आहे.

दरम्यान काल पुण्यात झालेल्या नाट्य परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार होते. मात्र अजित पवारांनी आपल्याला या कर्यक्रमाचे निमंत्रण आले नसल्याचे सांगत कार्यक्रमाला जाण्याचं टाळलं, यानंतर पिंपरी-चिंचवड येथील संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमात तरी काका-पुतण्या एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती.

अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत, इतकेच नाही तर दुपारी त्यांचे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम देखील आहेत. मात्र त्यांनी नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमाला येणे टाळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेल्या फुटीनंतर अजित पवारांनी उघडपणे शरद पवार यांच्याविरोधी भूमिका घेण्यास सुरूवात केली. यानंतर आता त्यांनी शरद पवारांसोबत एका मंचावर येणे देखील टाळल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुंबई-नाशिक महामार्गावर ५ ते ६ किमी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT