anna bansode
anna bansode 
पिंपरी-चिंचवड

अण्णा बनसोडेंवर गोळीबारानंतर पुत्राकडून अपहरण, खूनाचा प्रयत्न

पांडे मंगेश

पिंपरी : आमदार अण्णा बनसोडे(MLA Anna Bansode) यांच्यावर ठेकेदाराच्या सुपरवायजरने बुधवारी (ता.१२) गोळीबार(Firing) केल्याची घटना घडल्यानंतर आणखी दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मंगळवारी (ता.११) आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे (Siddharth bansode)याने त्याच्या साथीदारांसह ठेकेदाराच्या कार्यालयात घुसून काही जणांवर प्राणघातक हल्ला(Attempt to Murder) केल्याप्रकरणी तसेच बुधवारी ठेकेदाराच्या सुपरवायझरचे अपहरण(Kidnaps) करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पिंपरी (Pimpri)व निगडी(Nigdi) पोलिस ठाण्यात (Police) गुन्हे दाखल झाले आहेत. (attempt to murder and Kidnapping case filed against son of MLA Bansode after shooting attack)

आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे, त्यांचे पीए व इतर आठजण यांनी मंगळवारी (ता. ११) दुपारी साडेबाराला एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड मुंबई या ठेकेदार कंपनीच्या आकुर्डी येथील कार्यालयात शिरून कामगारांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी स्वाती सचिन कदम (वय ३९) यांनी निगडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आरोपींनी कंपनीच्या पॅन्ट्रीमध्ये जबरदस्तीने घुसून धनराज बोडसे, अमोल कुचेकर यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर तानाजी पवार कुठे आहे’ अशी विचारणा केली. तानाजी पवार यांच्याबाबत माहिती नसल्याचे ऑफिसमधील लोकांनी सांगितले असता ऑफिसमधील आयटी एक्झिक्युटिव्ह विनोदकुमार रेड्डी यांना लोखंडी टॉमी सारख्या शस्त्राने डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच कामगार गोकर्ण चव्हाण याला ढकलून देऊन जखमी केले. त्यानंतर एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड या कंपनीचे ऑफिस जबरदस्तीने बंद करण्यासाठी सांगून तानाजी पवार यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या घटनेप्रकरणी एजी इन्व्हायरो इन्फ्रा प्रायव्हेट लोमिटेड कंपनीचे सुपरवायझर तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी) यांनी पिंपरी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान आणि त्यांचे दहा ते पंधरा साथीदारांवर गुन्हा दाखल आहे. ११ मे रोजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणात तानाजी पवार आमदार बनसोडे यांना उलटे बोलले असल्याचा समज आरोपींचा झाला. त्यातून १२ मे रोजी सकाळी ११ वाजता पवार यांचे हेडगेवार भवन, आकुर्डी येथील त्यांच्या ऑफिसमधून बनसोडे यांच्या दोन साथीदारांनी अपहरण केले. त्यांना काळभोरनगर येथील एका कंपनीच्या कार्यालयात आणले. तिथे आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे, सावंतकुमार, लांडगे, सोन्या, साजिद, सुलतान व साथीदारांनी हाताने, लथाबुक्क्यांनी, चामडी पट्टयाने, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने मारून जखमी केले. सिद्धार्थ याने लोखंडी चॉपरने डोक्यात मारून पवार यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

तर बुधवारी आमदार बनसोडे यांच्यासह त्यांचा मुलगा व कार्यकर्त्यांच्या दिशेने गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तानाजी भगवान पवार (वय ३९, रा. मोशी), संकेत शशिकांत जगताप, श्रीनिवास बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी सावनकुमार रमेश सलादल्लू (वय ४८, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी पवार काम करत असलेल्या कंपनीत स्थानिक तरुणांना नोकरीस घ्यावे आमदार अण्णा बनसोडे यांनी चर्चेसाठी पवार याला बोलावले. बुधवारी (ता. १२) दुपारी पवार त्याच्या दोन साथीदारांसोबत आला. चर्चेदरम्यान शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देत आरोपीने आमदार बनसोडे यांच्या दिशेने गोळीबार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ऑडिओ क्लिप व्हायरल

आमदार बनसोडे व तानाजी पवार यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये पवार यांना शिविगाळ करण्यासह धमकी दिल्याचे समोर येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT