Worker Agitation to Auto Cluster
Worker Agitation to Auto Cluster Sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिका प्रशासनाच्यावतीने (Municipal Administrative) चालविण्यात येणाऱ्या ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर (Auto Cluster Covid Care Center) बंद (Close) करण्यात आले. त्यामुळे याठिकाणी काम करणाऱ्या सुमारे १५० कंत्राटी कर्मचाऱ्यांना (Contract Employee) प्रशासनाने कमी केले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकल्याप्रकरणी संतप्त कर्मचाऱ्यांनी सलग दोन दिवसांपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. दरम्यान मानधन व सहा महिने काम अशा अटी मान्य करणारे कर्मचारी नेमके कोणाच्या सांगण्यावरून आंदोलन करत आहेत, अशी चर्चा सध्या रंगली आहे. (Auto Cluster Covid Care Center Employee Unemployment)

कोविड काळात महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर सुरू केले होते. ‘स्पर्श’ हॉस्पिटलकडे या सेंटरचे व्यवस्थापन होते. मात्र, उपचार मोफत असताना व्यवस्थापनातील काही लोकांनी रुग्णांकडून पैसे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर महापालिका सभागृहात बराच गदारोळ झाला होता. यावर महापालिका आयुक्तांनी ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापन अधिगृहीत केले होते.

Agitation

दरम्यान, शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला. या सेंटरसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे भर उन्हात संतापलेल्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी सेंटरबाहेरच ठिय्या मांडला आहे. दरम्यान मानधन व सहा महिने काम अशा अटी मान्य करूनच कर्मचाऱ्यांना रूजू करून घेतले होते. मात्र ‘स्पर्श’ हॉस्पिटल आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका कर्मचाऱ्यांना बसला आहे.

Agitation

कोरोना पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘कोरोना योद्धा’ म्हणून काम करणारे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आज बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. वास्तविक, प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना सेवामुक्त करताना नोटीस किंवा एक महिन्यांचा पगार देणे अपेक्षीत होते. ऐन कोरोना आणि लॉकडॉउनच्या काळात संबंधित कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने महापालिकेच्या अन्य रुग्णालयांमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांना रुजू करुन घ्यावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. यावर आयुक्त पाटील आता काय निर्णय घेणार? याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT