sharad pawar
sharad pawar sakal media
पिंपरी-चिंचवड

नवीन भोसरी रुग्णालयातील आयसीयू युनिटचे शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या नवीन भोसरी रूग्णालयातील आय.सी.यू विभागाकरीता कॅप जेमिनी कंपनीने सी.एस.आर.फंडातून दिलेल्या १६ बेडसचे लोकार्पण खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. महापौर उषा ढोरे अध्यक्षस्थानी होत्या.

खासदार डॉ.अमोल कोल्हे, स्थायी सभापती नितीन लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, नगरसेवक अजीत गव्हाणे, रवी लांडगे, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, सारीका लांडगे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे, कॅप जेमिनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद शेट्टी, सहाय्यक आयुक्त राजेश आगळे,ज्ञअण्णा बोदडे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ.निलेश ढगे आदी उपस्थित होते.

कॅप जेमिनी कंपनी कडून आज महानगरपालिकेस १० आय.सी.यू यूनीट, ६ व्हेन्टीलेटर, १० मोनिटर, १० सिरींज पंप, १० बेड साईड लॉकर, १ हाई पॉवर एक्सरे मशीन, १ सोनोग्राफी मशीन, २ बायोमेडीकल वेस्ट कंटेनर, १वॉटर प्यूरीफायर, आदी सुमारे २ कोटी ५० लाखाची साहीत्य सी एस आर फंडातून सुपुर्द करण्यात आले. सुत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT