Bhosari  Sakal
पिंपरी-चिंचवड

Bhosari : भोसरीत रेकॉर्ड ब्रेक भाजप आमदारांची पाच कोटींची आखाडपार्टी! आमदार महेश लांडगे काय म्हणाले?

आखाड पार्टीत एक लाख ३७ हजार जणांनी सहभाग नोंदवला आहे. ही पार्टी एकूण तेरा ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Bhosari - भाजपचे शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभा मतदार संघात रविवारी (ता. ९) एकूण १३ ठिकाणी आखाडपार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी एकूण पाच कोटी रूपयांचा खर्च झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्टीत सुमारे १ लाख ३७ हजार जणांनी भोजनाचा आस्वाद घेतला. या वेळी तब्बल ४ टन मटण, २ टन चिकन फस्त करण्यात आले. राज्यातील ही ‘रेकॉर्डब्रेक’ आखाडपार्टी असावी, असा दावाही आयोजकांच्यावतीने करण्यात आला आहे.

आखाड पार्टीत एक लाख ३७ हजार जणांनी सहभाग नोंदवला आहे. ही पार्टी एकूण तेरा ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एक प्लेट ३५० रुपयांना पकडली तरी नुसत्या सामिष जेवणाचेच ४ कोटी ७९ लाख ५० हजार रुपये होतात. तर; शाकाहारींसाठी वेगळी सोय होती. एकूण सगळा थाट पाहता सुमारे ५ कोटी रुपये एका दिवसात खर्च झाले असावेत, अशी चर्चा शहरात आहे.

आषाढात मांसाहार करण्याची एक परंपरा आहे. मतदारसंघातील गोरगरीब, कष्टकरी, चाकरमानी यांच्यासोबत एकत्रितपणे आखाड पार्टी करण्यासाठी आम्ही १५ वर्षांपासून सुरुवात केली. त्याला आता भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. आपुलकीने नागरिक या स्नेहभोजनासाठी सहभागी होतात, याचे समाधान वाटते.

- महेश लांडगे, आमदार, भोसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India and Oman CEPA: भारत-ओमान करार लागू! होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर ही डील इतकी महत्त्वाची का? उद्योगांसाठी गेमचेंजर ठरणार

Mumbai News: 'वनराणी'ला पर्यटकांची पसंती! पाच महिन्यांत ३६ हजार जनाची सवारी, २९ लाख महसुलाची भर

MBA MMS CET Exam Result : एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर; एकूण ८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण

Bhimashankar News : भाविकांसाठी आनंदाची बातमी! श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सोमवारपासून होणार दर्शनासाठी खुले

Vidhan Parishad Election : महायुतीत ‘ऑल इज वेल’चा दावा; पण उमेदवारी अर्जावेळी दोन मंत्री, प्रमुख नेते अन् जिल्हाध्यक्ष अनुपस्थित, कारण काय?

SCROLL FOR NEXT