BJP 
पिंपरी-चिंचवड

भाजप नगरसेविकेच्या मुलाची एकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ; हिंजवडीत घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अचानक ब्रेक दाबल्याने झालेल्या अपघाताचा जाब विचारत मोटारचालकाला नगरसेविकेच्या मुलाने धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. ही घटना देहूरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर हिंजवडी येथे रविवारी (ता.२१) घडली. याप्रकरणी परस्परविरोधी अदखलपात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजदीप हेमंत तापकीर (रा. काळेवाडी) आणि अतुल ज्योतिराम सपकाळ (रा.वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी अदखलपात्र तक्रार दाखल केली आहे. राजदीप हे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप नगरसेविका सुनिता तापकीर यांचा मुलगा आहे. तर अतुल सपकाळ हे अभियंता असून त्यांचे वडील ज्योतिराम हे निवृत्त सहायक फौजदार आहेत.

पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ हे रविवारी (ता.21) सकाळी सव्वानऊच्या सुमारास वडील ज्योतिराम यांच्यासह मोटारीतून चालले होते. हिंजवडी येथे एका हॉटेलसमोर अतुल यांनी काही कारणामुळे अचानक मोटारीचा ब्रेक दाबला. याचवेळी पाठीमागून एसटी बस चालली होती. मोटारीने ब्रेक दाबल्याने एसटी बसचालक राहुल उबाळे यांनी तातडीने ब्रेक लावत गाडी थांबवली. मात्र, याचवेळी एसटी बसच्या मागून येणारे तापकीर यांच्या मोटारीने पाठीमागून बसला धडक दिली. या अपघातात तापकीर यांच्या मोटारीच्या पुढील भागाचे आणि एसटी बसचे नुकसान झाले. याबाबत तापकीर यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.

दरम्यान, आपल्याला तापकीर यांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची तक्रार अतुल सपकाळ यांनी केली आहे. तर, अतुल यांच्यासह इतर दोन जणांनी आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याची तक्रार राजदीप तापकीर यांनी केली आहे. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT