Cemetery
Cemetery Sakal
पिंपरी-चिंचवड

स्मशानभूमीत मृतदेह जळत आहेत अर्धवट

आशा साळवी

पिंपरी - स्मशानभूमीत (Cemetery) कोरोनाबाधित मृतदेहांवर (Deathbody) महापालिकेतर्फे मोफत अंत्यसंस्कार (Cremated) केले जातात. एका मृतदेहामागे आठ हजार रुपये खर्च महापालिका उचलते, तरीही स्मशानभूमीत मृतदेह अर्धवट जळत असल्याची धक्कादायक माहिती (Information) समोर आली आहे. निकृष्ट दर्जाची लाकडे आणि बहुतांश वेळा लाकडाचा कमी वापर केल्याने योग्य प्रकारे राख होत नसल्याचे आढळले आहे. यातूनच भटकी कुत्री (Dog) कोरोनाबाधित मृतदेहाचे लचके तोडत असल्याचे अंगावर शहारे आणणारे दृश्य निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत (Amardham Cemetery) दिसते. सरणाअभावी जळत असणारे मृतदेह आणि भटक्या कुत्र्यांचा गराडा, असे भयावह चित्र या ठिकाणी दिसते. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. (Bodies are Partially Cremated in the Cemetery Pimpri Chinchwad)

शहरातील बहुतांश भागातील मृतदेह या अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी आणण्यात येतात. या ठिकाणी मार्च व एप्रिल महिन्यात विद्युत शवदाहिन्या सतत धगधगत होत्या. अतिरिक्त ताणामुळे त्या काहीवेळा बंदही पडल्या होत्या. त्यामुळे याठिकाणी पारंपरिक पद्धतीने अंत्यविधीची सोय केली आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक खैरनार व काही मित्रांसह एका नातेवाइकांच्या अंत्यविधीसाठी दोन जूनला सायंकाळी सहा वाजता गेले होते. त्यावेळी पुरेशा लाकडांअभावी मृतदेह अर्धवट जळाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर याची माहिती त्यांनी ‘सकाळ’ला दिली. यानंतर प्रतिनिधीने शुक्रवारी (ता. ४) सकाळी पाहणी केली असता, अत्यंत वेदनादायी चित्र पाहायला मिळाले. याठिकाणी सरणासाठीचे बारा ओटे आहेत. प्रत्येक ठिकाणी दोन कुत्री बसलेली होती. काही कुत्री अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे अवयव खात होते. याबाबत तेथील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना नेमकी कारणे सांगता आली नाहीत. या स्मशानभूमीतील छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये टिपलेली दृश्य भयावह आहेत, तरीही या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. सोशल मीडियावर नागरिकांनी टीकेची झोड उडविली आहे.

उपस्थित होणारे प्रश्‍न

  • ही लाकडे ओली असतात का?

  • दहनासाठी छोटी-छोटी लाकडे वापरतात?

  • एखाद्यावेळेस लाकूड कमी वापरतात?

  • मोठी लाकडे उपलब्ध नसल्याने प्रेत जाळण्यास अडथळा का?

  • ती जळत नसल्याचे दाखवून अधिकची लाकडे खरेदी केली जातात?

सद्यःस्थिती काय?

  • दररोजचे मृत - २०

  • विद्युत दाहिनीवर -१० ते १५ (अंत्यसंस्कार)

  • सरणावर पारंपरिक पद्धतीने - ६ ते ७ (अंत्यसंस्कार)

  • एका शवासाठी लागतात - ७ मण (२८०-३००किलो) लाकूड, २०० गोवऱ्या

  • दहनासाठीचा वेळ - पाच ते सहा तास

लाकडाचा कमी वापर?

या स्मशानभूमीला लाकूड पुरवण्याचा ठेका शुभम उद्योग या संस्थेस महापालिकेने निविदा प्रक्रियेतून दिला आहे. एक दहनासाठी ३०० किलो लाकूड आणि २०० गोवऱ्या लागतात. लाकूड हे ११ रुपये किलो दराने दिले जाते, तर एक गोवरी दहा रुपयाने खरेदी केली जाते. तरीही दहनासाठी पुरेशा प्रमाणात लाकूड वापरले जात नाही. कमी लाकडात दहन करण्यात येत असल्याने मृतदेह नीट जळत नसल्याची वस्‍तुस्थिती आहे. एका दहनासाठी पाच ते सहा तास लागतात. त्यामुळे राख होईपर्यंत ताटकळत बसण्याऐवजी नातेवाईक निघून जातात. महापालिकेच्या संबंधित विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाइकांच्या भावनांशी खेळ होत आहे, अशी प्रतिक्रिया आहे.

शुभम उद्योग संस्थेला काम दिले आहे. सदरचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात येईल.

- महेश आढाव, आरोग्य निरीक्षक, निगडी स्मशानभूमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT