Pimpri Chinchwad Municipal Corporation sakal
पिंपरी-चिंचवड

पिंपरी : स्थायी समितीच्या चौदा जणांचा लाचलुचपत विभाग नोंदवतंय जबाब

स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अठरा ऑगस्ट रोजी छापा टाकला होता.

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अठरा ऑगस्ट रोजी छापा टाकला होता. अध्यक्षांसह पाच जणांना अटक झाली होती. वर सोळा जणांना पैसे द्यावे लागतात, असा जबाब कर्मचाऱ्यांनी पोलिस कोठडी असताना दिला होता. त्यानंतर स्थायीच्या उर्वरित चौदा जणांना एसीबीने नोटीस बजावली होती. त्यानुसार सदस्यांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक बैठक बुधवारी दुपारी असते.‌अठरा ऑगस्ट रोजी बैठक संपल्यानंतर एसीबीने छापा टाकला होता. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायकासह पाच जणांना अटक केली होती. ठेकेदाराची वर्क ऑर्डर काढण्यासाठी नऊ लाख रुपये मागितले होते. एक लाख अठरा हजार रुपयांचा हप्ता घेताना ही कारवाई झाली होती.

महापालिका स्थायी समिती सभेत सोळा सदस्य आहेत. त्यात एक अध्यक्ष व पंधरा सदस्य असतात. मात्र, सत्ताधारी भाजपच्या एका सदस्याने फेब्रुवारी महिन्यात राजीनामा दिलेला होता. त्यामुळे उरलेल्या पंधरा सदस्यांमध्ये भाजपचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक असे पंधरा सदस्य होते. त्यांनाही एसीबीने नोटीस दिली होती. त्या नुसार सर्व सदस्य आपापले जबाब नोंदवत असल्याचे एका पदाधिकाऱ्यांने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

खलनायक ते राजकारणी: ज्येष्ठ अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचा प्रवास थांबला; 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Joint Pain Diet: पावसाळ्यात संधिवाताचा त्रास कमी करण्यासाठी काय खावे, काय टाळावे?

IND vs FRA: युरोप दौऱ्यावर असलेल्या भारताचा हॉकीत सलग तिसरा विजय; फ्रान्सलाही दिली मात

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

SCROLL FOR NEXT