Wrestler sakal
पिंपरी-चिंचवड

Wrestler : बुचडे कुस्ती अकादमीच्या कुमार पैलवानांनी भारतीय संघात आपली जागा केली पक्की

जॉर्डन येथे होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आयटी पार्क मारुंजी येथील दोन कुस्तीगीरांनी ग्रीको रोमन प्रकारासाठी भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हिंजवडी - जॉर्डन येथे १० ते १८ जुलै दरम्यान होणाऱ्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आयटी पार्क मारुंजी येथील पै. अमोल बुचडे कुस्ती अकादमीच्या ओंकार कराळे (३८ किलो) व सोहमराज मोरे (७५ किलो) या दोन कुस्तीगीरांनी ग्रीको रोमन प्रकारासाठी भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे.

सोनिपत येथे ७ जुन रोजी अस्थायी-समिती भारतीय कुस्ती महासंघाने आयोजित केलेल्या खुल्या १५ वर्षाआतील भारतीय संघ निवड चाचणीमध्ये उत्कृष्ठ कामगीरी करत या मल्लांनी उत्तरेतील मल्लांना जशास तसे उत्तर देत स्थान पक्के केले आहे.

रुस्तम-ए-हिंद पै. अमोल बुचडे, पै. विनोद गोरे, नरेंद्र कुमार, पवन गोरे, प्रा. किसन बुचडे, पै. महेश घुले, कपिल बुचडे, डॉ. संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बुचडे कुस्ती अकादमीत हे मल्ल चार वर्षांपासून सराव करत आहेत.

निवड झाल्यानंतर या दोघा पैलवानांचे व त्यांच्या कुटुंबीयाचे अकादमीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी सकाळशी बोलताना पै. अमोल बुचडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून आंतराष्ट्रीय दर्जाचे गुणवंत मल्ल घडविण्यासाठीच आंतराष्ट्रीय दर्जाची अकादमी सकारण्यात आली आहे.

त्याचाच हा पहिला टप्पा असून, येत्या काळात आशियाई, जागतिक आणि ऑलम्पिक स्पर्धेत राज्यातील मल्लांनी देशाचे प्रतिनिधित्व जास्तीत जास्त पदकांची कमाई करावी. हे आमचे उद्दिष्टे असून त्यादृष्टीने आम्ही सर्वजण मेहनत घेत आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT