पिंपरी-चिंचवड

विद्यार्थी, पालकांनो फेसबुक लाईव्हद्वारे जाणून घ्या 'दहावी व बारावीनंतरच्या वाटा'

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्गाने अनेकांचे करिअर उद्‌ध्वस्त झाले आहे. सुरुवातीला अनेक मागणी असलेल्या करिअरच्या वाटाही लॉकडाउनच्या काळात बदललेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या भविष्याविषयी पालकांच्या मनात अनेक प्रश्‍नांचे काहूर माजले आहे. मात्र, प्रत्येक प्रश्‍नांचे उत्तर फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून मिळाल्याने पालकांची चिंता दूर होण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महाअंनिस) पिंपरी-चिंचवड, पुणे व प्रतिभा महाविद्यालय चिंचवड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने ऑनलाइन सदरामध्ये 'दहावी व बारावीनंतरच्या वाटा' हा फेसबुक लाइव्ह संवाद रविवारी 7 जूनला सायंकाळी 5 ते 6 या वेळेत होणार आहे. फेसबुकवर संवाद साधण्यासाठी कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया हे https://www.facebook.com/rdkankariya या लिंकवर उपलब्ध होणार आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या दहावी व बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत. त्यानंतर विविध डिग्री कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. त्यामुळे पालकांनाही मुलांसाठी नेमके कोणते करिअर निवडावे याविषयी शंका आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनाही प्रश्न पडत आहेत, की कोर्स कोणता निवडायचा, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, फॉर्म कसा भरावा, अशा विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विद्यार्थी व पालक ऑनलाइन संवादात सहभागी होऊ शकतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : रेकॉर्डब्रेक! सोन्यात अवघ्या 12 तासांत 5 हजारांची वाढ; चांदी तर त्याहून सुसाट; पाहा आजचा भाव

Nashik Tapovan News : नियमांशिवाय एकही झाड तोडू नका! नाशिक महापालिकेला पुन्हा जोरदार झटका; तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

Latest Marathi News Live Update : मुंबई–नाशिक सत्ता समीकरणांवर भाजप–शिवसेना वाटाघाटी तेजीत

Ration Card Update : रेशनचे धान्य कायमचे बंद होणार, राज्य शासनाकडून सर्व जिल्ह्यांना याद्या जाहीर, केशरी व पिवळ्या शिधापत्रिकांचा पुरवठा थांबणार

Deputy CM Eknath Shinde: उल्हासनगरमध्ये महायुतीचाच महापौर होणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; भाजप विरोधी बाकांवर बसणार!

SCROLL FOR NEXT