पिंपरी-चिंचवड

सामाजिक बांधिलकी जपत लोहगडावर असा साजरा केला शिवराज्याभिषेक दिन

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ : श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड-विसापूर विकास मंच व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या वतीने लोहगडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोहगड-विसापूर गड परिसरातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

शिवराज्यभिषेक दिनानिमित्त लोहगड येथील शिवस्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत लोहगड, मालेवाडी, धालेवाडी, महागाव, मळवली येथील गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंग व इतर सर्व काळजी घेण्यात आली होती.

याप्रसंगी गणेश धानिवले, रमेश बैकर, राजू शेळके, शंकर चिव्हे, बाळासाहेब जाधव, अतुल बालघरे, तुकाराम बैकर आदी उपस्थित होते. मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे, विश्वास दौंडकर, संदीप गाडे, सागर कुंभार, सचिन निंबाळकर, चेतन जोशी, अमोल गोरे, अनिकेत आंबेकर, अजय मयेकर आदिंनी संयोजन केले. मंचाच्या वतीने गेली २० वर्षे लोहगड विसापूर किल्ल्यांचे गडसंवर्धन व विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. 

किल्ले तिकोणागडावर शिवराज्याभिषेक दिन साजरा...         

वडगाव येथील गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
 गडावरील देवता वेताळ महाराज, चपेटदान मारूतीराय, तळजाई माता, वितंडेश्वर यांचे पुजन करण्यात आले. वितंडेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. आरती व शिववंदना घेण्यात आली. उपस्थितांना बुंदीचे वाटप करण्यात आले. गडावर नवीन भगवा ध्वज लावण्यात आला. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचे विश्वनाथ जावळीकर, सतिश मोहोळ, गुरूदास मोहोळ, किरण चिमटे, विनायक हिरे आदी उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला जय शाह अन् ICC ची भीती! Asia Cup वर बहिष्कार टाकण्याचा विचार सोडला?

Latest Marathi News Updates : अस्वलांच्या भयानक हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

Side Effects of Overuse of Antibiotics: प्रतिजैविक औषधांचा अंदाधुंद वापर धोकादायक तज्‍ज्ञ डॉक्‍टरांच्या परिषदेत विस्‍तृत चर्चा

Barshi Fraud News : शेअर बाजारात गुंतवणुकीचे अमिष; बार्शीत १ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक, तीन महिलांसह सात जणांवर गुन्हा

Pune Traffic : शहरात पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT