पिंपरी-चिंचवड

पिंपरीत केमिकल कंपनीत भीषण स्फोट; परिसरातील घरांचे नुकसान

स्फोट इतका भीषण होता की, परिसरातील घरांच्या काचा फुटल्या आहेत. तर भिंतींना तडे गेले आहेत. स्फोटाच्या आवाजाने परिसरात भीतीचं वातावरण आहे.

सकाळ डिजिटल टीम

कानठळ्या बसविणाऱ्या या स्फोटामुळे कंपनीच्या सिमेंटच्या भिंती पडल्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते.

पिंपरी - थेरगाव येथील मॅग्नेशियम पावडरच्या कंपनीत शनिवारी दुपारी अचानक आग लागली. यामध्ये मॅग्नेशियम पावडरचे भीषण स्फोट झाले. कानठळ्या बसविणाऱ्या या स्फोटामुळे कंपनीच्या सिमेंटच्या भिंती पडल्या. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. थेरगाव येथील पद्मजी पेपर मिलसमोर टी के मेटल नावाची कंपनी आहे. या कंपनीतील मॅग्नेशियम पावडरचा शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास स्फोट झाला. यावेळी चारजण कंपनीत काम करीत होते. आगीचा भडका उडताच ते बाहेर पडले. काही वेळातच आग मोठ्या प्रमाणात पसरली. दूरपर्यंत धूर पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वारंवार स्फोट होत होते.

घटनेनंतर काही वेळातच पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्राच्या दोन तर रहाटणी व निगडी प्राधिकरण उपकेंद्राची प्रत्येकी एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. पाणी फवारून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मॅग्नेशियम पावडर असल्याने पाण्याने आग आणखी वाढत होती. त्यामुळे माती अथवा वाळूने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ट्र्कभर वाळू मागविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न काम सुरू होते. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

कानठळ्या बसवणारा आवाज

आग जसजशी भडकत होती. तसतसे मॅग्नेशियम पावडरचे स्फोट होत होते. या स्फोटाचा आवाजाने अक्षरशः कानठळ्या बसत होत्या. परिसरातील नागिरकांमध्ये अधिकच भीती पसरली. तसेच या स्फोटाच्या ठिणग्या आजूबाजूला उडत असल्याने शेजारील सोसायटीतील केबीनसह एका छोट्या कंपनीतही आग लागली.

भिंत पडली, काचा फुटल्या

या स्फोटाच्या धमाक्याने घटना घडलेल्या कंपनीसह शेजारील एका दुकानाच्याही भिंती पडल्या. तसेच आजूबाजूच्या दुकानांसह घरांच्या काचा फुटल्या. आग पसरल्याची भीती लक्षात घेऊन आजूबाजूची दुकाने तातडीने रिकामी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 LIVE : बीडमध्ये कुणाची सत्ता येणार, धनंजय मुंडेंना धक्का?

Indian travelers in USA: भारतीय प्रवासी अमेरिकेत किती दिवस राहू शकतात? दूतावासाने जारी केल्या सूचना ; व्हिसावर अवलंबून नाही

Pune Cyber Crime: सायबर फसवणुकीतून कोटींची लूट; शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

Pune Cold Weather: पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका; किमान तापमान ८.१ अंशांवर, पहाटे गारठा

Maharashtra Cold Wave: : राज्यात पुन्हा थंडीची लाट, हुडहुडी वाढली; आज दिवसभरात कसे असेल हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT