Chinchwad By-Election NCP Nana Kate fist reaction on facing BJP Ashwini Jagtap Maharashtra politics  
पिंपरी-चिंचवड

Chinchawad ByPoll Result: चिंचवडमध्ये पराभवानंतर नाना काटेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, पैशांचा...

भाजपचे उमेदवार आश्विनी जगताप यांच्याप्रती मतदारांची सहानुभूती नव्हती असाही दावा त्यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चिंचवड पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल कलाटेंची बंडखोरी आणि मोठ्या प्रमाणावर पैशांचं वाटप यामुळं आमचा पराभव झाला असं त्यांनी म्हटलं आहे. (Chinchawad ByPoll Result Nana Kate first reaction after defeat in Chinchwad)

सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले होते. चांगल्या पद्धतीनं प्रचार झाला होता, मतदानही चांगल्या पद्धतीनं झालं. बंडखोरीचा फटका आम्हाल बसला. त्यातही आमचचं मतदान आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काही मतदान असू शकतं, पण ते मतदान देखील महाविकास आघाडीचं आहे.

मतदानाच्या आगोदर त्यांनी पोलीस बळ वापरुन आमचे बरेचशा कार्यकर्त्यांना उचललं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर इथं पैशांचा वापर झाला. ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून कार्यकर्ते चिंचवडमध्ये झटून काम करतील. भाजपच्या उमेदवाराला सहानुभूती नव्हती, त्यांना पराभवाची भीती दिसत होती. सहानुभूती असती तर एवढ्या प्रमाणात पैसे वाटण्याची वेळच आली नसती, असा आरोपही यावेळी नाना काटे यांनी केला.

हे ही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT