पिंपरी-चिंचवड

चिंचवडमधील भाजी मंडई सुरू होणार; पण, हे नियम पाळावे लागणार

सकाळ वृत्तेसवा

पिंपरी : गेल्या दीड महिन्यांपासून अन्यत्र स्थलांतरित झालेल्या भाजी मंडईंनी अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत पास देऊन पुन्हा मूळ जागी व्यवसाय सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून परवानगी देण्यास सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत चिंचवड येथील भाजी मंडई बुधवारपासून (ता. 3) सुरू होणार असल्याने नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी सोमवारी सायंकाळी आदेश काढला. 

चिंचवड येथील अखिल मंडई मित्र मंडळाचे अध्यक्ष अतुल पडवळ, उपाध्यक्ष सागर गरुड आदींनी महापालिका प्रशासनाकडे अत्यावश्‍यक सेवेअंतर्गत भाजीमंडई पुन्हा सुरू करण्यासाठी पासची मागणी करणारे पत्र दिले होते. त्यानुसार सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने त्यांना 30 जूनपर्यंत अटी, शर्तींवर भाजी मंडई सुरू करण्यास परवानगी दिली. पावसाला हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे. स्थलांतरित झालेली मंडई चित्तराव गणपती मंदिराजवळील मोकळ्या जागेत सुरू होती. मात्र पावसामुळे गेले दोन दिवस ग्राहक फिरकत नव्हते. तसेच, तेथे कोणतीही पत्र्याची शेडची व्यवस्था नव्हती. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात मंडळाचे उपाध्यक्ष सागर गरुड यांनी सांगितले, "मंडई अनेक दिवस बंद होती. त्यामुळे तेथे मंगळवारी (ता. 2) साफसफाई करून संपूर्ण मंडई सॅनिटाईज करण्यात येईल. त्यानंतर बुधवारपासून नियमितपणे व्यवसाय सुरू होईल.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

काय आहेत नियम 

  • मंडईत एकूण 48 गाळे आहेत. 
  • सम-विषम पद्धतीने गाळे सुरू राहतील. 
  • प्रवेशद्वारावर ग्राहकांना सॅनिटायझरचा वापर बंधनकारक 
  • ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अत्यावश्‍यक 
  • शरीराचे तापमानाचे मोजमाप आवश्‍यक 
  • मंडईच्या एका बाजूने प्रवेश आणि दुसऱ्या बाजूने बाहेर जाता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheetal Pawar : सकाळ माध्यम समूहाला मिळाल्या पहिल्या महिला संपादक; 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीच्या कार्यकारी संपादकपदी शीतल पवार यांची नियुक्ती

Virat Kohli : विराट कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेतोय? वाचा किंग कोहली काय म्हणाला, BCCI नेही थेट सांगितलं की...

Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठा बदल, खरेदी अन् विक्रीआधी जाणून घ्या आजचा ताजा भाव....

Chhatrapati Sambhajinagar Crime : दुल्हेराजाची वरात पोलिसांच्या दारात; मित्राच्या मदतीने चोरल्या आठ दुचाकी, दोघे ताब्यात

Latest Marathi News Live Update : अकोल्यात पिस्तुलासह चार जिवंत काडतूस जप्त, आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT