Citizens are facing problems by stray dogs and alcoholics in Sangvi park 
पिंपरी-चिंचवड

अंगावर धावणारी मोकाट कुत्री अन् तळीरामांचा त्रास; सांगा उद्यानात यायचे कसे?

रमेश मोरे

जुनी सांगवी : सांगा, आम्ही उद्यानात वावरायचे कसे? असा प्रश्न जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील दुरवस्थेबाबत सांगवीकर नागरीकांमधून विचारला जात आहे.ते म्हणजे येथे वाढलेला मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर व तळीरामांकडून या जागेचा होणारा वापर यामुळे येथील नागरीक हैराण झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जुनी सांगवीतील मधूबन सोसायटी मुळानदीकिनारा भागात छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आहे. जुनी सांगवीतील हे मोठे उद्यान आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात काही महिने बंदनंतर पुन्हा उद्यान सुरू झाले असले तरी उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने कुत्र्यांच्या दहशतीमुळे येथे नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अंगावर धावून येणे,भुंकणे,उद्यान परिसरात घाण करणे यामुळे नागरीक उद्यानात यायला धजावत नाहीत. यातच या परिसरात मद्यपी तळीरामांचाही वावर वाढला आहे.प्रवेशद्वारावरच दारूच्या मोकळ्या बाटल्या, कचरा नित्याचा झाला असल्याने अशा प्रवृत्तींना प्रतिबंध करावा अशी मागणी होत आहे. यापुर्वी वेळोवेळी उद्यान विभाग व सांगवी पोलिसांकडे येथील नागरीकांनी तोंडी तक्रार देखील केली आहे. या परिसरात नियमित पोलिस गस्त वाढवावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

''उद्यानाचे सौंदर्य पाहाता येथे नियमित व्यायाम व फेरफटका मारण्यासाठी नवी सांगवी, पिंपळे गुरव व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने येतात. मात्र सध्या या उद्यानात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. याचबरोबर रोज येथे दारूच्या बाटल्या प्लॅस्टीक कचरा आढळून येत आहे. गणेश ढोरे अध्यक्ष मधुबन मित्र मंडळ याबाबत तीन दिवसापुर्वीच येथील मोकाट कत्र्यांच्या वावराबाबत पशुवैद्यकीय विभागाला पत्र देवून कारवाई बाबत कळविले आहे''.
- जे.व्ही.पटेल उद्यान अधिकारी जुनी सांगवी.

1) येथे ओपन जिम आहे. व्यायामासाठी या उद्यानात नागरीक मोठ्या प्रमाणात येतात.
2) लॉकडाऊन उद्यानबंदनंतर उद्यानविभागाचे झालेले दुर्लक्ष.
3) मोकाट कुत्र्यांमुळे सकाळी येणाऱ्या नागरीकांची संख्या घटली.
4) रात्रीच्यावेळी तळीरामांकडून प्रवेशद्वार व परिसराचा केला जातोय उपयोग.
5) नियमित गस्त व प्रतिबंध करण्याची सांगवी पोलिसात नागरीकांची मागणी. 
6) सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी मात्र कॅमेरांचा अभाव.


पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम थंडावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT