commissioner orders fine for not wearing mask 
पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडकरांनो मास्क घालूनच बाहेर पडा; नाही तर दंड!

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क नसल्यास ५०० रुपये व थुंकल्यास एक हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे.

पोलिसांना कारवाईचे आदेश
कोरोना व लॉकडाऊन काळात राज्य सरकारने लागू केलेले निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केलेले आहेत. मात्र, शहरातील प्रत्येक नागरिकाने सार्वजनिक व खासगी ठिकाणी संचार करताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे शहरातील सर्व मंगल कार्यालये, सांस्कृतिक सभागृह, सर्व प्रकारचे सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम, सभा, संमेलने अशा मोठ्या संख्येने लोक एकत्र येणाऱ्या कार्यक्रमात मास्क वापरणे बंधनकारक आहे. मात्र, गर्दी होणार नाही याची दक्षता संयोजकांनी घ्यायची आहे. सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, उपहारगृहे, तसेच,सरकारी व खासगीसह महापालिकेची सर्व कार्यालये आदी ठिकाणी मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. मास्क नसल्यास कारवाई करून तडजोड शुल्क वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेची आठही क्षेत्रिय कार्यालयांचे सहाय्यक आरोग्य अधिकारी, मुख्य आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरीक्षक, कार्यालय अधिक्षक यांना देण्यात आले आहेत. ही कार्यवाही परिणामकारक होण्यासाठी पोलिसांनाही कारवाईचे अधिकार दिले आहेत.

कार्यक्रमांमध्ये नियमांचे पालन व्हावे
यापूर्वी कार्यक्रमांना दिलेल्या परवानगीनुसार नियमांचे पालन करीत कार्यक्रम होतील, असेही आदेशात म्हटले आहे. दरम्यान, तत्कालीन महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर असताना प्रभारी पदभार असलेले पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे यांनी, ‘एका मोटारीत एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्यास मास्क आवश्‍यक नाही,’ असा आदेश २८ जानेवारी रोजी दिला आहे. मास्क वापराबाबत यापूर्वी दिलेले आदेश कायम राहतील, असेही बुधवारी काढलेल्या आदेशात आयुक्त पाटील यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US National Debt : अमेरिकेवर कर्जाचा डोंगर! पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्ज ४० ट्रिलियन डॉलर पार; जगातील महासत्तेसमोर मोठे आर्थिक संकट?

Congress Lok Sabha: लोकसभेच्या जागा २५ वर्षांसाठी गोठवा; काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची मागणी, देशातील आठशे शहरांत ‘छात्रों की गूंज’

मध्यप्रदेशातून बंदुका आणून ५० हजारांत विकणारा सांगलीचा तरूण जेरबंद! मध्यप्रदेशसह माढा, पंढरपूर, सांगोला, आटणी तालुक्यातील ८ जण अटक, १७ गावठी बंदुका जप्त, वाचा...

Maharashtra weather update : महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान नाही? कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे; IMDचा अंदाज

Beed Municipal Council : बीड नगरपालिकेत ‘आपसातच’ जुंपली; ठरावातील फेरबदलावरून उपनगराध्यक्ष अन् सभापती भिडले

SCROLL FOR NEXT