school reopen 
पिंपरी-चिंचवड

शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम; मुख्याध्यपकांना पडला प्रश्न

सकाळवृत्तसेवा

पिंपरी, ता. 9 : कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने शहरातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद राहतील, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले होते. परंतु अद्याप नवा आदेश आलेला नाही. परिणामी नियोजन करायचे कसे? असा प्रश्‍न मुख्याध्यापकांना पडला आहे. स्थानिक महापालिका प्रशासनाने दोन दिवसांत निर्णय दिला तर पूर्वनियोजन करणे सोपे जाईल, अशी मागणी अनेक मुख्याध्यापकांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पहिल्यांदा 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार होत्या. त्यानुसार बहुतांश शाळांनी तयारी केली होती. परंतु शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यासाठी त्याला मुदतवाढ मिळाली. 13 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ होती. मात्र, अद्याप स्थानिक प्रशासनाकडून निर्णय न आल्यामुळे सर्वच संभ्रवास्थेत सापडल्या आहेत.

काय म्हणताहेत मुख्याध्यापक
नीलेश गायकवाड (मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय, भोसरी ) : ""शाळा, मुख्याध्यापक व संस्था शाळा सुरू करण्याबाबत सकारात्मक आहेत; पण जबाबदार स्थानिक प्रशासनाने योग्य आदेश द्यावेत. शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यासाठी शाळा ठेवल्या होत्या. आता लवकर निर्णय घ्यावा.' 'सुनील लाडके, प्राचार्य, (श्री म्हाळसाकांत विद्यालय, आकुर्डी) : ""आयुक्तांनी लवकरात लवकर आदेश काढावेत. पालकांची संमती पत्र असेल तर अनुपस्थित राहिला तरी सक्ती नाही. पण संमती पत्र नसेल तर वर्गात बसता येणार नाही.''

शाळा सुरू होणे आवश्‍यक आहे. परंतु त्यासाठी आयुक्तांची परवानगी सुद्धा गरजेची आहे. कमीत कमी चार ते पाच दिवस अगोदर आदेश यावेत. म्हणजे तयारी करता येईल. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना संमती पत्राची सूचना दिली आहे. 14 तारखेला किती विद्यार्थी शाळेत येतील, त्याचा अंदाज घेता येईल. तसेच त्याची संख्या गरजेनुसार आयुक्तांना पाठविता येईल. शाळा सुरू होणे आवश्‍यक आहे. आम्ही योग्य आदेशाची वाट पाहत आहोत, असं एच. ए. स्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ बुरसे यांनी म्हटलं आहे.


सयाजीनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक राजकुमार गायकवाड यांनी म्हटलंय की, नऊ महिन्यांचा कालावधी लोटला. मुलेही शाळेचा रस्ता विसरले असतील. शालेय वातावरण आणि शालेय स्थिती अत्यंत विस्कळित झाली आहे. पूर्ववत होण्यासाठी आता शाळा सुरू होणे गरजेचे आहे.''

नाना शिवले, (शिक्षक, प्रेरणा विद्यालय थेरगाव) : "आम्ही शाळा सुरू करण्याच्या भूमिकेतच आहोत. आम्ही योग्य आदेशाची वाट पाहत आहोत.' 

कोट
""शाळा सुरू करण्यासाठी तयारी करावी लागते. त्यासाठी चार पाच दिवस अगोदर कळाले तर चांगले होईल. त्यानुसार नियोजन करता येते. दुसरीकडे कोणत्याही आदेशाशिवाय शासन निर्णयानुसार सर्व ग्रामीण भागात शालेय कामकाज सुरू झाले आहे.''
- महेंद्र गणपुले , प्रवक्ते, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT