पिंपरी-चिंचवड

मावळ : ग्रामीण भागात वाढतेय पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शुक्रवारी कामशेत व साई येथील प्रत्येकी दोन; तर  लोणावळा, सुदुंबरे, कार्ला व मळवली येथील प्रत्येकी एक, अशा आठ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १८८ झाली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साई येथील एका पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या संपर्कातील त्याचे ६२ वर्षीय वडील व २९ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. कामशेत येथील एका कोरोनाबाधित पुरुषाची ५० वर्षीय पत्नी व २३ वर्षीय सुनेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भांगरवाडी (लोणावळा ) येथील एका ६० वर्षीय महिलेचा, सुदुंबरे येथील एका ३६ वर्षीय एनडीआरएफ जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील तीन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. कार्ला फाटा येथील एका ५५ वर्षीय भाजीविक्रेत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या संपर्कातील नऊ  जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. 

मळवली येथील एका ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कातील दोन जणांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. शुक्रवारी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या १८४ झाली आहे. त्यात शहरी भागातील ७३, तर ग्रामीण भागातील १११ जणांचा समावेश आहे. तळेगाव येथील सर्वाधिक ५५, लोणावळा येथील १५, तर वडगाव येथील रुग्ण संख्या तीन झाली आहे. आतापर्यंत  नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ८१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ९४ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

Nilanga News : मदतीसाठी कागदपत्रांचा ससेमिरा! गावाचा एकच पंचनामा करून सरसकट मदत द्या; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मागणी

Latest Marathi News Live Update : शिक्षक भरतीत लाखोंची फसवणूक, अपूर्व हिरेंसह पाच जणांवर गुन्हा

Pune News : उजनीतील खासगी मासेमारी ठेका प्रक्रिया रद्द; जलसंपदा विभागाच्या बैठकीत निर्णय

Baramati Crime : शेरेवाडी दुहेरी खूनाचा गुन्हा उघड....; नातलगानेच केला दुहेरी खून....

SCROLL FOR NEXT