पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ, तर 37 जणांना डिस्चार्ज  

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. आज (शुक्रवार) सलग दुसऱ्या दिवशी चाळीसपेक्षा अधिक रुग्ण आढळले. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयांत उपचार केले जात आहेत. आज 44 नवीन रूग्ण आढळले तर, 37 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

वायसीएम व भोसरी रुग्णालयातून आज 37 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ते किवळे, पिंपळे सौदागर, वाकड, चिंचवड आनंदनगर, बौद्धनगर, भोसरी, पिंपरी, निगडी, काळेवाडी फाटा, येरवडा, देहूरोड, सोलापूर, जून्नर, खडकी, आंबेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना चौदा दिवस घरातच राहण्याची सूचना वायसीएम प्रशासनाने केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गुरुवारी सायंकाळपासून शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत 44 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात 23 पुरूष व 21 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 678 झाली आहे. त्यापैकी 416 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 250 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे आनंदनगर चिंचवड, पिंपळे गुरव, दापोडी, वाकड, पिंपरी, कासारवाडी, अजंठानगर, चऱ्होली, भोसरी, काळेवाडी, रुपीनगर, राजगुरुनगर येथील रहिवासी आहेत. आज दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात दापोडीतील 80 वर्षीय आणि राजगुरुनगर येथील 58 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पावसाळा सुरू झालेला असल्याने नागरिकांनी अत्यावश्‍यक कारणाशिवाय घरा बाहेर पडू नये. पावसामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सोबत किमान एक अतिरिक्त मास्क ठेवावा, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

Chandu Chauhan : ‘सर्जिकल स्ट्राइक’मधील वादग्रस्त चंदू चव्हाण अटकेत; पोलिसांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Updates : खासदार बजरंग सोनवणेंच्या समर्थकांचं 'बंदूक फोटोशूट', ‘शो ऑफ’ चांगलंच अंगलट आलं, गुन्हा दाखल

पाय फ्रॅक्चर झाल्यावरही नृत्याच्या कार्यक्रमासाठी जिद्दीने उभी राहिली अभिनेत्री; "फक्त मनात ठरवता.."

SCROLL FOR NEXT