पिंपरी-चिंचवड

कोरोनाबाधित रुग्ण म्हणतायेत, 'आम्हाला पोटभर जेवण द्या'; वायसीएम रुग्णालयातील स्थिती

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) कोविड रुग्णालयातील दाखल कोरोनाबाधित रुग्णांवर उपासमारीची वेळ आल्याची विदारक परिस्थिती समोर आली आहे. या रुग्णांना दोन वेळचे जेवण दिले जात असले, तरी प्रत्यक्षात अपुऱ्या प्रमाणात आणि वेळेत मिळत नाही. आम्हाला किमान पोटभर तरी जेवण द्या, नाहीतर आम्ही वाचणार कसे? असे प्रश्‍न विचारत रुग्णांनी हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप प्रशासनावर केला आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या रुग्णांना जेवण, नाश्ता, चहा अशी सुविधा आहे; मात्र त्यासाठी नव्याने नियुक्त कंत्राटदाराकडून जेवणाच्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे रुग्णांसह डॉक्‍टरांनादेखील जेवणासाठी वणवण करावी लागत आहे. टेंडरनुसार सकाळचा नाश्‍ता साडेआठ वाजता देणे अपेक्षित आहे. पण तो दहा वाजता मिळतो. दुपारचे जेवण एकऐवजी साडेतीन वाजता आणि रात्रीचे जेवण आठऐवजी साडेदहा वाजता मिळत असल्याची माहिती रुग्णांनी 'सकाळ'ला दिली. पूर्वी वेळेत चहा, जेवण मिळत होते. आता मात्र, नाश्‍त्यासाठी अवघे 40 ग्रॅम पोहे दिले जातात. दुपारच्या जेवणात पातळ दोन चपाती व वरण-भात दिला जातो. हे जेवण पुरेसे नसल्याने अक्षरश: उपाशीपोटी झोपावे लागत असल्याची माहिती रुग्णांनी दिली.

वाढीव दराने निविदा, तरी रुग्ण उपाशी

सुरुवातीला हे काम थेट पद्धतीने एका कॅन्टीग चालकाला दिले. यासाठी प्रतिव्यक्ती 150 रुपये दर होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे काम काढून घेतले. त्यानंतर नव्याने 180 रुपये दर देऊन दुसऱ्या केटरर्सची निवड केली. काही दिवसांनंतर त्यांच्याकडून पुरेशा प्रमाणात आणि वेळेत जेवण पुरविण्यात येत नसल्याच्या तक्रारी रुग्णांनी केल्या आहेत. त्यांनी आपापल्या नातेवाईक व मित्रांना होणारी हेळसांड सांगितली आहे. निकृष्ट जेवणामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली होत आहे.

प्रतिआहार 180 रुपयांचा दर

सध्या सुरू असलेल्या आहाराचा दर प्रतिव्यक्ती 180 रुपये आहे. यात दोन वेळचे जेवण, चहा व नाश्‍ता, एक लिटरच्या तीन बॉटल अशी सेवा दिली जाते. रुग्णांना अतिशय तुच्छ अशी वागणूक दिली जात आहे. जेवणासाठी त्यांची नावे माईकवरून पुकारण्यात येत असल्याने रुग्णालयाची शांतता भंग होत असल्याची तक्रारी आहेत.

रुग्णांच्या जेवणासाठी निविदा प्रक्रिया राबवली असून, नव्या निविदाधारकाला काम दिले आहे. संबंधितानी जेवण देण्यासही सुरुवात केली आहे.
- मंगेश चितळे, सहाय्यक आयुक्त भांडार विभाग

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अचानक मला पाहून शिंदे थबकले; संजय राऊत काय म्हणाले? दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हायरल

Ruturaj Gaikwad चा वर्ल्ड रेकॉर्ड! शतक ठोकून मोडला बाबर आझमचा विक्रम, महाराष्ट्राचा संकटमोचक

Latest Maharashtra News Updates Live: काँग्रेसमधील १२ निलंबित नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

हळदीकुंकवात करंडे- फण्या देऊन कंटाळलात? डीमार्टमध्ये १५ रुपयापासून मिळतायत भन्नाट ऑप्शन; वाचा यादी

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रकल्पांना भूसंपादनाचे ग्रहण; शेतकऱ्यांच्या विरोधामुळे प्रशासन चिंतेत

SCROLL FOR NEXT