पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील कोविड केअर सेंटरची 'केअर' आता खासगी संस्थांकडे 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ते खासगी रुग्णालये, स्वयंसेवी किंवा सामाजिक संस्थांना तीन महिने कालावधीसाठी चालविण्यास देण्यात येणार आहेत. यासाठी सहा संस्था पुढे आल्या असून, त्यांना कामाचा आदेशही दिला आहे. यासाठी सुमारे दहा कोटी 12 लाख 23 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. 

महापालिकेने डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह रावेत, मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 व 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, म्हाडा वसाहत महाळुंगे सी-11, बी-11 व 12, ए-11, बालेवाडी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्‍चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. ते चालविण्यासाठी ट्रस्ट हेल्थ केअर, आयकॉन हॉस्पिटल, डीवाईन हॉस्पिटल, डॉ. भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रुबी अलकेअर सर्विसेस, बीव्हीजी इंडिया, आयुश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक्‍सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्‍नोलॉजी कंपनी या संस्था तयार झाल्या आहेत. त्यांना प्रतिबेड प्रतिदिवस मंजूर दराप्रमाणे तीन महिने कालावधीसाठी शुल्क दिले जाणार आहे. ठिकाण व बेडच्या संख्येनुसार एका बेडचे एका दिवसाचे शुल्क ठरविण्यात आले आहे. 

कोविड केअर सेंटर शुल्क 

  • बेड क्षमता : शुल्क (प्रतिबेड) 
  • 100 : 699 
  • 200 : 543 
  • 300 : 500 

दृष्टिक्षेपात कोविड केअर सेंटर 

  • एकूण सेंटर : 16 
  • संचालक संस्था : 6 
  • एकूण बेड : 3500 
  • अपेक्षित खर्च : 10,12,23,000 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT