पिंपरी-चिंचवड

पिंपरी : मुलांचे अपहरण करून अश्लील कृत्य करणाऱ्यांवर गुन्हा

अश्लील कृत्यप्रकरणी पिंपरीत १९ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे अपहरण करून मारहाण करीत त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या १९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार पिंपरीतील रिव्हररोड येथे घडला.

सचिन सौदाई, सनी सौदाई, अजय टाक, जतिन मेवाती, अनिल पिवाल, जतिन टाक, तौसिफ़ सय्यद, कृष्णा बॉक्सर पारधे, वरूण टाक, कपिल टाक, आशिष ननावरे, जय पिवाल, विनय वेद, सद्दाम शेख, खलिल शेख, अरुण टाक, विजय चव्हाण, खुबचंद मंगतानी ऊर्फ बुगी , सोनू मंगतानी (सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तीन महिन्यापूर्वी घडलेल्या या घटनेप्रकरणी ४४ वर्षीय महिलेने शुक्रवारी फिर्याद दिली आहे. पिंपरी भाजी मंडईत चोरी केल्याच्या संशयावरून तीन महिन्यांपूर्वी पहाटेच्या सुमारास आरोपी हे फिर्यादीच्या अल्पवयीन मुलासह आणखी दोन अल्पवयीन मुलांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून रिव्हररोडवरील विसर्जन घाटाकडे घेऊन गेले. तेथे शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी व पट्ट्याने मारहाण केली. पाळलेले श्वानांना चावण्यासाठी त्यांच्या अंगावर सोडले. त्यांच्याशी अश्लील वर्तन करीत या भागात पुन्हा दिसायचे नाही व कुठेही तक्रार करायची नाही, अशी धमकी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update: अंदमानात मान्सून आला रे! केरळात २६ मेपर्यंत पोहोचणार; कोकण किनारपट्टीवर कधी दाखल होणार?

CJI सूर्यकांतांच्या ‘कॉकरोच’ टिप्पणीवर मोठं स्पष्टीकरण; बेरोजगार युवकांबाबत नेमकं काय म्हणाले?

Meta Ray-Ban चश्मा झाला अपडेट! हवेत बोटं फिरवा अन् मेसेज पाठवा, व्हॉट्सॲप-इन्स्टाग्रामवर आपोआप होणार टायपिंग

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांचा एक निर्णय बदलून टाकतो त्यांचे आयुष्य..घडवतो नाहीतर 'बि'घडवतो

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून महिला लेक्चररला अटक, विद्यार्थ्यांमध्ये खळबळ!

SCROLL FOR NEXT