पिंपरी-चिंचवड

'चमको' कार्यकर्त्यांमुळे कोविड टेस्टिंग सेंटरमध्ये उडतोय फज्जा!

आशा साळवी

पिंपरी : लॉकडाउन असूनही शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येला ब्रेक लागावा, यासाठी शहरात ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत. मात्र, काही 'चमको' लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे टेस्टिंग सेंटरमध्ये गर्दी वाढत आहेत. परिणामी सेंटरमध्ये सोशल डिस्टंन्सिगचा अक्षरश: फज्जा उडू लागला आहे. 

महापालिकेच्या वायसीएम व भोसरी रुग्णालयासह खासगी आठ रुग्णालयांत आणि अकरा कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची स्वॅब टेस्टिंग सुरू केली आहे. कोरोनाचा संसर्ग शहरातील आमदार, नगरसेवक, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील झाला आहे. एका नगरसेवकाचा मृत्यूदेखील झाला आहे. सद्य:स्थितीत दररोज 400, तर 500 बाधित रुग्णांची नोंद होत आहे. अशा बिकट परिस्थितीतही अनेक 'चमको' सामाजिक कार्यकर्ते आणि 'हौशी' लोकप्रतिनिधींकडून शहरात 'अमुक ठिकाणी स्वॅब टेस्टिंग होत आहे, तिथे जा आणि तपासणी करून घ्या', अशा मथळ्याच्या पोस्ट फेसबुक, व्हॉटसअपच्या माध्यमातून केल्या जात आहेत. त्या पोस्टवर तपासणी केंद्राचे नाव आणि आधारकार्ड सोबत घेऊन जाण्याची टीपदेखील दिली जाते. त्यामुळे तपासणीसाठी नागरिकांची झुंबड उडत आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, सेंटरच्या नियमावलीनुसार ज्या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडतील, त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक, मधुमेही, हायपरटेन्शन, रक्तदाब अशांना प्राधान्य दिले जायचे. त्यांची पहिली तपासणी केली जायची. या सेंटरमध्ये जाण्याअगोदर बाधित ज्या परिसरातील आहे, त्यांनी त्या परिसरातील महापालिकेच्या रुग्णालयातील 'रेफरशिट' घेऊन येणे आवश्‍यक आहे. मात्र, आता या सोशल मीडियाच्या पोस्टातून संदेश मिळाल्यामुळे नागरिक थेट जात असल्याने गर्दी वाढत आहेत. मात्र काही 'चमको' कार्यकर्त्यांमुळे टेस्टिंग सेंटरचा पुरता गोंधळ उडत असल्याने डॉक्‍टरांना हाताळणे कठीण जात आहे. या बेशिस्त नागरिकांमुळे सेंटरचा फज्जा उडवला जात असल्याचे चित्र सर्वत्र आहे. 

नागरिकांना आवाहन 

आकुर्डी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी सुनीता साळवे यांनी नागरिकांनी सोशल डिस्टंन्सिगने पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी आरडाओरड न करता सहकार्य केले, तर त्यांचीच तपासणी लवकर होईल. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णांचा ओपीडी पेपर काढून माहिती भरणे. ऑनलाइन एंट्री करण्यामुळे वेळ जातोय. त्यामुळे नागरिकांना थांबावे लागत आहे. आता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर माता यांना प्राधान्य देतोय. त्यांना रांगेत थांबवत नाहीत. एखाद्या रुग्ण आजारी असला तरी, त्यांची चाचणी करतोय.
- डॉ. हरीश शेंडे, टेस्टिंग इनचार्ज, बीएसएनएल आरटीटीसी, शाहूनगर

Edited by : Shivnandan Baviskar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT