पिंपरी-चिंचवड

संत तुकाराम महाराज बीज सोहळा काळात देहूत राहणार संचारबंदी!

सकाळवृत्तसेवा

देहू : संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत २९ आणि ३० मार्च या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहे. गावात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० जणांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराज बीज सोहळा होणार आहे, अशी माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या ३० मार्च बीज सोहळा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देहूत बीज सोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत. तसेच स्थानिक पोलिस प्रशासन यांना नियोजन करण्याचे आदेश दिलेले आहेत. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त आणि देहूरोड पोलिस ठाण्याच्या वतीने नियोजनासंबंधी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक विलास सोंडे बोलत होते. संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, अजित महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माजी विश्वस्त अशोक महाराज मोरे व इतर उपस्थित होते. 

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांना आवाहन केले आहे. या बाबत विचारले असता विलास सोंडे म्हणाले, ‘‘बीज सोहळ्यासाठी सरकारच्या आदेशानुसार केवळ ५० लोकांनाच पास देणार आहोत. पास तपासूनच लोकांना प्रवेश देण्यात येणार आहे. गावात २९ मार्चला अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद राहतील. त्याचप्रमाणे ३० मार्चला बीज आहे. सार्वजनिक गाथा पारायण सोहळ्यासाठी परवानगी कोणालाही दिलेली नाही. 

अशी असेल उपस्थिती 
- देऊळवाड्यात ः २० जण 
- पालखीसोबत ः २० जण 
- वैकुंठस्थान मंदिरात ः १० जण 

‘‘सरकारच्या आदेशानुसार ५० जणांच्या उपस्थितीत सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे. आम्ही सरकारला संपूर्ण सहकार्य करणार आहोत. बंडातात्या कराडकर त्यांच्या पद्धतीने बीज सोहळा पार पाडण्याचे ठरवतील. आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार बीज सोहळा करणार आहोत.’’ 
- मधुकर महाराज मोरे, अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT