पिंपरी-चिंचवड

पिंपरी : कष्टकरी कामगार पंचायतीकडून कष्टकऱ्यांना जेवण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कष्टकरी आणि असंघटित कामगारांची उपासमार होऊ नये, यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीतर्फे पिंपरी येथे अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. या अन्नछत्रामधून रोज एक हजार कष्टकरी कामगारांना जेवण दिले जात आहे. 17 मे पर्यंत हे अन्नछत्र चालू राहणार आहे. 

टाळेबंदीमुळे हातावर पोट असणारे रिक्षाचालक, धुणीभांडी, स्वयंपाक, सफाई कामगार, कागद-काच-पत्रावेचक, बांधकाम मजूर, फेरीवाले आदी कष्टकरी नागरिकांचे हाल सुरू आहेत. त्यांची उपासमार होऊ नये, यासाठी कष्टकरी कामगार पंचायतीच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मागील अल्पाइन हॉटेल येथे 'भुकेलेल्यांना अन्न- एक हात मदतीचा' या उपक्रमांतर्गत अन्नछत्र (किचन) सुरू करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने या अन्नछत्रास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. उद्योजक दिलीप तिलवानी आणि बशीर सय्यद यांच्या हस्ते कष्टकऱ्यांना पॅकेट वाटून अन्नछत्राला सुरुवात करण्यात आली. यावेळी कष्टकरी कामगार पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे, उद्योजक राजू गिडवानी, अनिल शिंदे ,कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सचिव प्रल्हाद कांबळे आदी उपस्थित होते. 

अन्नछत्राचे संयोजक बबन मिसाळ म्हणाले, "रोज सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जेवण तयार करण्याचे काम सुरू असते. गरजू लोकांना चपाती, भाजी, मसाले भात दिला जात आहे. बौद्ध पौर्णिमेमुळे गुरुवारी (ता. 7) खीरचाही जेवणात समावेश करण्यात आला. गरजू लोकांची आम्ही यादी तयार केली आहे. त्यानुसार एक हजार लोकांना जेवण दिले जात आहे. काही वेळेस अचानक लोक येऊन जेवणाची मागणी करतात. त्यामुळे आम्हाला किमान 200 लोकांसाठी जादा जेवणाची पाकिटेही तयार ठेवावी लागतात. कुदळवाडी, निगडी ओटा स्कीम, मोशी, रुपीनगर भागांतही आम्ही अन्नवाटप करत आहोत.'' 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रिक्षाचालक, घरेलु कामगार, बांधकाम मजूर, कागद काच पत्रा वेचक, फेरीवाले आदी कष्टकरी, असंघटीत कामगार यांना चपाती, भाजी, वरण-भाताची पाकिटे घरपोच देण्यात आहेत. ज्यांना अन्नाचे पाकिटे पाहिजे असतील, त्यांनी बबन मिसाळ, मो. 9766072222 या क्रमांकावरती संपर्क करावा, असे आवाहन पंचायतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT