पिंपरी-चिंचवड

लग्नकार्यानिमित्त आई-वडील लातूरला गेले अन् मुलगा परीक्षेमुळे भोसरीत अडकला

संजय बेंडे

भोसरी : लग्नकार्यानिमित्त भोसरीतील भाड्याच्या घरात राहणारे गिरी कुटुंब लातूरला गेले. मात्र, दहावीचा भूगोलाचा पेपर राहिल्याने त्यांनी मुलगा दीपक याला भोसरीतच ठेवले.  परंतु, लातूरला गेल्यानंतर कोरोनामुळे लॅाकडाऊन सुरू झाला आणि गिरी कुटुंब गावालाच अडकले. तेव्हा घरमालक वसंत सोळंके यांनी दीपकला घरच्या मुलासारखे सांभाळले आणि माणूसकी अजूनही जीवंत असल्याचे दाखवून दिले.

भोसरीतील संत तुकारामनगरात राहणारे हनुमंत गिरी यांच्या भावाच्या मुलीचे लग्न १९ मार्चला ठरल्याने ते भोसरीतून कुटुंबासह १४ मार्च रोजी लातूरला गेले. त्यांचा मुलगा भोसरीतील श्रमजीवी शाळेत दहावीत शिकत आहे. त्याचा भूगोलाचा पेपर राहिल्याने हनुमंत यांनी त्याला भोसरीतच ठेवले. मात्र, संचारबंदी लागू झाली. २२ मार्चला लॅाकडाउन  सुरू झाला आणि गिरी कुटुंब लातूरलाच अडकले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा         

लॅाकडाउनमुळे भोसरी एमआयडीसीतील कंपन्यातील कामही बंद झाल्याने हनुमंत यांनी लातूरलाच राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व प्रवासी वाहने बंद असल्याने दीपकला लातूरला आणण्याची चिंता गिरी यांना लागली होती. मात्र, त्यांचे घरमालक वसंत सोळंके आणि कुटुंबीयांनी दीपकला आधार देत घरच्या मुलाप्रमाणे सांभाळले.  त्याचप्रमाणे दीपकची काही काळजी न करण्याचा दिलासाही सोळंके कुटुंबीयांनी गिरी कुटुंबाला दिला. भूगोलाचा पेपरही रद्द झाल्याने दीपकला लातूरला आणण्याचा निर्णय गिरी यांनी घेतला. यासाठी गिरी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसदस्य संजय वाबळे यांच्याशी संपर्क साधला. वाबळे यांनी संपर्क कार्यालयामार्फत दीपकला लातूरला जाण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या परवानगीसाठी मदत केली. संपर्क कार्यालयातील गिरीश वाघमारे यांनी यासाठी मोलाची मदत केली. दीपकला रविवारी (ता. १७) लातूरला जाण्यासाठी आयुक्तालयाने परवानगी दिली. त्यामुळे दीपकचा लातूरला जाण्याचा मार्ग मोकळा झालेा आहे.

दीपकला दिला आधार

कोरोनाचा संसर्ग कुटुंबातील व्यक्तिंना होऊ नये, यासाठी घरातील मोठी मंडळी लहान मुलांची काळजी घेतात. त्यांना घराबाहेर सोडत नाहीत. त्याचप्रमाणे वसंत सोळंके आणि सुशिला सोळंके यांनी दीपकची काळजी स्वतःच्या मुलाप्रमाणे घेतली. त्याला घराबाहेर जाऊ दिले नाही. १५ मार्च ते १७ मे अशी दोन महिने दीपकचा सांभाळे सोळंके कुटुंबीयांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केला आणि माणुसकी अजूनही जीवंत असल्याचे दाखवून दिले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सोळंके कुटुंबीयांचा आदर्श

लॅाकडाउनमुळे काम बंद झाल्याने खाण्यापिण्याची आबाळ होत असल्याने आणि राहण्याची सोय नसल्याने परराज्य आणि राज्यातील नागरिक आणि तरुण त्यांच्या मूळगावी जाताना दिसतात. काही प्रवासी वाहनाने तर काही सायकलने जाताना दिसतात. त्याचप्रमाणे काहीजण पैशांअभावी पायी जाताना दिसतात. अशा परिस्थितीत सोळंके कुटुंबीयांसारखे औदार्य दाखवले, तर परराज्य आणि आंतरराज्य जाणाऱ्या तरुणांचा लोंढा कमी होणे शक्य असल्याचे काही नागरिकांनी बोलून दाखविले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT