Dehu Sant Tukaram maharaj sakal
पिंपरी-चिंचवड

Sant Tukaram Maharaj : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज प्रस्थान

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी (ता. १०) दुपारी दोन वाजता देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शुक्रवारी देहूत दिंड्यांचे आगमन झाले. तसेच विविध गावांतील वारकरी आणि भाविक वाहनांमधून दाखल झाले. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला. मंदिर परिसरात टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शनबारीतून भाविकांना देऊळवाड्यात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येत होता. देहू नगरपंचायत प्रशासनाने सोहळ्यातील भाविकांना विविध सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून तयारी पूर्ण केली आहे. नगरपंचायत प्रशासनाने कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू केला.

सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १५ पोलिस निरीक्षक, ६० सहाय्यक पोलिस निरीक्षक, २७५ पुरुष पोलिस, १५० महिला पोलिस, २०० होमगार्ड, एसआरपीची एक प्लॅटून आणि स्ट्राकिंग फोर्सची एक तुकडी असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच आरोग्य, पाणीपुरवठा, वीजपुरवठा विभागानेही ठिकठिकाणी मदत केंद्र सुरू केले आहेत.

गावात विविध ठिकाणी अन्नदान

संत तुकाराम महाराज अन्नदान मंडळाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून भाविकांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. तसेच गाथा मंदिर परिसरात सुदर्शन मित्र मंडळाच्या वतीनेही दहा हजार वारकऱ्यांसाठी अन्नदानाची सोय केली आहे. तसेच माळवाडी, विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने वारकरी आणि दिंड्यांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT