पिंपरी-चिंचवड

पिंपरी : जलनिस्सारण वाहिनीच्या अर्धवट कामामुळे रखडले डांबरीकरण

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी गावातील पॉवर हाऊस चौक ते अशोक टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावर जलनिस्सारण वाहिनी टाकण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत सोडल्याने रस्त्यावर मधोमध मोठे खड्डे पडले आहेत. येत्या काही आठवड्यात पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था आणखी वाईट होणार असल्याने हे काम त्वरीत मार्गी लावावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

महापालिकेच्या 'ग' क्षेत्रीय कार्यालयामार्फत टाळेबंदी लागू होण्यापूर्वी मार्च महिन्यात अमृत योजनेमधून पॉवर हाऊस चौक ते अशोक टॉकीजपर्यंतच्या रस्त्यावर जलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र, टाळेबंदी लागू झाल्यानंतर हे काम अधर्वट पडले. रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी भूयारी गटारांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. परंतु, एके ठिकाणी बांधकाम खचल्याच्या स्थितीत आहे. येत्या काही आठवड्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट होईल. वाहतूकीसाठी हा रस्ता अतिशय धोकादायक झाला असून, रात्रीच्या वेळेस रस्त्यातील खड्डे आणि उंचवटे वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे बरेचसे दुचाकी चालक घसरून जखमी झाले आहेत. 

एखादे मोठे वाहन वा बस या रस्त्यावरून आल्यास वाहतूक कोंडी होते. त्याने वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. या रस्त्यावर पादचाऱ्यांनाही जीवमुठीत धरून चालावे लागते. तरी या रस्त्यावर गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पहाता संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे दुरुस्तीकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पालिकेच्या जलनिस्सारण विभागाशी संपर्क केला असता टाळेबंदीमुळे हे काम बंद होते. येत्या दोन दिवसांत हे काम सुरू करता येईल काय? या बाबत परवानगी घेत आहोत. तशी परवानगी मिळाल्यावर काम सुरू करता येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT