पिंपरी-चिंचवड

पिंपरी : रेनकोटच्या अर्थकारणावर यंदा असा झालाय परिणाम; विक्रेते म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : रेनकोटच्या दरात यंदा झालेली दहा टक्के वाढ, कोरोनाचा प्रादुर्भाव, दुकानांना मिळालेला कमी वेळ यासारख्या कारणांमुळे यंदा रेनकोटच्या मागणीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

कोरोनामुळे अनेक व्यवसायांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सामान्यपणे मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेकजण रेनकोट खरेदी करतात. यंदा मात्र, तशी स्थिती नाही. अद्याप शाळा, महाविद्यालयेही सुरू झालेली नाहीत. त्याचा फार मोठा परिणाम मागणीवर झाला आहे. एकूण मागणीच्या 50 टक्‍क्‍यांहून अधिक मागणी ही विद्यार्थी वर्गाकडून असते, असे पिंपरी येथील एका विक्रेत्याने सांगितले. नजीकच्या काळात शाळा, महाविद्यालये सुरू झाली नाहीत, तर व्यावसायिकांना पुढचे वर्षभर तग धरणे जिकिरीचे जाणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही व्यावसायिक केवळ रेनकोट विक्रीचाच व्यवसाय करतात, तर काहीजण तयार कपड्यांबरोबरच रेनकोटही विकतात. त्यामुळे केवळ रेनकोट विक्री करणाऱ्यांना आधीच तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्यातच सध्या अनेकांच्या नोकऱ्याही जात आहेत किंवा नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे काही जणांनी इच्छा असूनही आपले खरेदीचे निर्णय पुढे ढकलले आहेत. काही जणांनी जुने थोडेसे खराब झालेले रेनकोट दुरुस्त करुन वापरण्याला पसंती दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

रेनकोटचे दर 

सामान्यपणे रेनकोटचे दर 510 रुपयांपासून 732 रुपयांपर्यंत आहेत. त्यामध्ये शर्ट, पॅन्ट आणि टोपीचा समावेश असतो. अधिक दर्जेदार (ब्रॅण्डेड) रेनकोटचे दर अगदी एक हजार ते बाराशे रुपयांपर्यंतही आहेत. रेनकोट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेल्या मटेरिअल, त्याची शिवण यानुसार त्याचे दर ठरतात. लॉकडाऊनमुळे यंदा नवीन माल फारसा बाजारात आलेला नाही. मात्र, मजुरांची कमतरता, ट्रान्सपोर्टच्या भावात झालेली वाढ यामुळे दरात 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली आहे. लष्करी गणवेश (चट्टपट्टे) असलेल्या रेनकोटला तरुणाईची पसंती आहे. काही दुकानदारांनी विक्री वाढविण्यासाठी दुकानाच्या बाहेरही सेल्समन बसविले आहेत. 

यंदा मागणीत 80 टक्के घट झाली आहे. बाजारात ग्राहकांचा अभाव आहे. नियमानुसार दुकानाची वेळ सकाळी नऊ ते दुपारी पाचपर्यंत आहे. मात्र, लोक कोरोनाच्या भीतीमुळे खरेदीसाठी बाहेर पडत नाहीत. आज रविवार आहे. मात्र तरीही त्यामानाने बाजारात अपेक्षित गर्दी नाही. 

- बाबूलाल बिष्णोई, रेनकोट विक्रेता, पिंपरी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT