depression  sakal
पिंपरी-चिंचवड

नैराश्यातून बाहेर पडा; चिंता सोडा

‘उमेद जागर’ उपक्रमात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पानसे यांचे विधवांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘‘गेल्या दीड वर्षात आपण स्वकीयांचे मृत्यू, लॉकडाउन, बेरोजगारी अशा नैराश्याच्या वातावरणात जगत आहोत. यातून असुरक्षा आणि चिंतेची भावना वाढलेली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी मनापासून प्रयत्न होणे गरजेचे आहे. ठामपणाने सामोरे जाणे हेच एक उत्तर आहे,’’ असे मत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या सहयोगी प्राध्यापक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्मिता पानसे यांनी व्यक्त केले. (Pune News)

कोरोनामुळे विधवा झालेल्यांसाठी महापालिकेतर्फे संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित ‘उमेद जागर’ उपक्रमाच्या तृतीय सत्रात डॉ. पानसे यांनी समुपदेशन केले. नगरसेविका माधुरी राजापुरे, सुजाता पालांडे, नागरवस्ती विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

डॉ. पानसे म्हणाल्या, ‘‘उमेद जागर उपक्रमातून विधवांना उभारी देण्याबरोबरच आत्मनिर्भर करण्याचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल महापालिकेने उचलले आहे. मानसिकदृष्ट्या सावरण्याचे काम यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ करणार आहेत. वेळीच आपण दुःखातून स्वतःला सावरले नाही, तर पुढे खूप त्रास होतो. यासाठी एखादी उमेद जागृत ठेवणे आवश्यक असते. ती असल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. कोणतेही दुःख एका ठराविक मर्यादेपर्यंत सांभाळून नंतर त्यातून सावरणे अपेक्षित असते. अन्यथा त्यातून नैराश्‍यात जायला वेळ लागत नाही. राग, द्वेष वाढीला लागतात.’’ सुहास बहाद्दरपुरे यांनी सूत्रसंचालन केले.

विविध कार्सेसची माहिती

महापालिकेच्या उमेद जागर उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात पुणे कनेक्ट लाईट हाऊस या स्वयंसेवी संस्थेच्या सोनाली कांबळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. लाइट हाउस उपक्रमातून राबविल्या जाणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती दिली. उपायुक्त चारठाणकर यांनी नागरवस्ती विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची व योजनांची माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Accident: कल्याणमध्ये भीषण अपघात, टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू

"दारूमुळे नाटक इंडस्ट्री बरबाद झाली" अभिनेते सुनील तावडेंनी व्यक्त केली खंत "मी अत्यंत तिरस्कार..."

Pimpalgaon Rescue: पिंपळगाव-खडकीत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने थरारक सुटका

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात 'तगडा' खेळाडू दाखल, मात्र निर्माण झालाय गोंधळ; कोण IN, कोण OUT?

हेमंत ढोमेच्या सिनेमात सेमच स्टारकास्ट दिसते... इंडस्ट्रीतल्या गटबाजीवर श्वेता शिंदेचं स्पष्ट मत, म्हणते- माझी मुलगी जर...

SCROLL FOR NEXT