Crime 
पिंपरी-चिंचवड

२५  हजार रुपये लाच स्वीकारताना लोणावळ्यात दुय्यम निबंधक अटकेत

सकाळवृत्तसेवा

लोणावळा - जमीन खरेदी व्यवहाराची नोंदणी करण्यासाठी २५  हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधकासह खासगी इसमास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. निबंधक रवींद्र जनार्दन भोसले (वय-५०, रा. कॅम्प, पुणे) व खाजगी इसम रमेश आंद्रे (वय-३८, रा. नाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बुधवारी (ता.२५) रात्री उशिरापर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई सुरू होती.  तक्रारदाराची  वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमधील जागेचे खरेदी खत नोंदविण्यास  लोणावळा उपनिबंधक टाळाटाळ करत होते. सदर खरेदी खत नोंदणीसाठी मध्यस्थामार्फत ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने (वय - ६०, रा. मुंबई) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. बुधवारी सायंकाळी दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावत तडजोडअंती ठरलेली  २५ हजार रुपयांची लाच खासगी इसम रमेश आंद्रे यांच्यामार्फत  स्विकारताना निबंधक रवींद्र भोसले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार मुश्ताक खान, पोलीस शिपाई किरण चिमटे,  पांडुरंग माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT