पिंपरी-चिंचवड

पिंपळे गुरवमध्ये गाडी पार्किंगच्या कारणावरून वाद; एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार पिंपळे गुरव येथे घडला.
 विशाल गिरीश हळंदे (वय 36), लोकेश गिरीश हळंदे (वय 35), गिरीश नामदेव हळंदे (वय 60, सर्व रा. लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक एक, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रामदास नारायण कडलग (वय 62, रा. लक्ष्मीनगर गल्ली क्रमांक एक) यांनी फिर्याद दिली. 

शनिवारी (ता. 22) सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी हे गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून आरोपी विशाल यास समजावून सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याने फिर्यादीला दगडाने मारहाण केली. तर इतर आरोपींनी लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

दरम्यान, फिर्यादीची पत्नी व मुलगी भांडणे सोडविण्यास आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करीत शिवीगाळ केली. यामध्ये फिर्यादीच्या पत्नीचे मंगळसूत्र व मुलीच्या कानातील रिंग गहाळ झाली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Winter Session Travel Costs : हिवाळी अधिवेशनामुळे नागपुरचा प्रवास महागला; मुंबई-नागपूर विमानभाडे २० हजारांवर, हॉटेलच्या दरातही वाढ

Who Was India’s First Test Cricketer? गुरनूर ब्रारला ३२१ क्रमांकाची कसोटी कॅप; पण, भारताची 'नंबर १ कॅप' नावावर असलेला खेळाडू कोण? २९व्या वर्षी झालेलं अकाली निधन

Shaktipeeth Mahamarg Protest : भाळवणीत शेतकऱ्यांचा रुद्रावतार! पोलिस फौजफाट्यासमोरच 'शक्तिपीठ'ची मोजणी उधळली; महिलांसह ग्रामस्थ आक्रमक

Shubham Dongre Murder Case : पुण्यात रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ आरोपींना जन्मठेप, न्यायालयाचा निकाल

Latest Marathi News Live Update : 100 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असणार

SCROLL FOR NEXT