पिंपरी-चिंचवड

बेरोजगार तरुणांनो सावधान! 'एसएमएस गॅंग'ने फेकलंय जाळे

अविनाश म्हाकवेकर

पिंपरी : दहावी-बारावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! आठ तास काम,
वीस हजार पगार, प्रॉव्हिडंट फंड, निवास-भोजनाची मोफत व्यवस्था, कामावर जाण्या-येण्यासाठी कंपनीची बस सुविधा, दररोज तीनशे रुपये लॉकडाऊन अलाऊन्स, ओव्हरटाईमचे वेगळे पैसे, पाच दिवसांचा आठवडा...असे शेकडो मेसेज मोबाईलवर फिरत आहेत; मात्र सावधान. कारण बेरोजगार तरुण-तरुणींसाठी 'एसएमएस गॅंग'ने फेकलेले हे जाळे आहे. यात अडकला तर आर्थिक, मानसिक व शारिरिक शोषण
होण्याची दाट शक्‍यता आहे. परप्रांतीय श्रमिक गावी गेल्यामुळे नोकरीचे आमिष दाखवले जात आहे.

कोरोनाच्या धास्तीने आणि उद्योगधंदे बंद पडल्याने परप्रांतीय श्रमिकांनी आपापल्या राज्याचा मार्ग धरला आहे. आता सरकारच्या सुचनांनुसार कंपन्या सुरू झाल्या आहेत. परंतु अकुशल व अर्धकुशल कामगारांची कमतरता भासू लागली
आहे. याच संधीचा फायदा घेवून "एसएमएस गॅंग' उगवल्या आहेत. या टोळीच्या विनाभांडवली धंद्यात पाच-सहा ओळींचा एक आकर्षक मेसेज एवढीच गुंतवणूक असते. किमान दहावीपासून इंजिनिअरपर्यंतच्या नोकऱ्या आमच्याकडे उपलब्ध असे यात सांगितले जाते. तसेच शिक्षणाच्या पात्रतेपासून पगाराचे किती पॅकेज व कोणकोणत्या सुविधा अशी भूलविणारी माहिती घातली जाते. यातून शहराचे आकर्षण आणि रोजगाराची आशा यामुळे बेरोजगारांची यात फसगत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या दोन वर्षांत केवळ पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव, तळेगाव अशा औद्योगिक परिसरातील 22 टोळ्यांवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे हा प्रकार पूर्ण थांबला होता. मात्र, पुन्हा असे मेसेज व्हॉटस्‌ऍपवर फिरू लागले आहेत.
-----------------------------

अशी केली जाते फसगत...

- मेसेजवर केवळ आकर्षक पगार व सुविधा आणि संपर्क क्रमांक. यात कंपनीचे नाव किंवा वेबसाईट याचा उल्लेख नसतो
- गरजूकडून मेल ऐवजी व्हॉटस्‌ऍपवर कागदपत्रे मागवून घेणे
- दोन दिवसांनी नोकरी मिळाली आहे, मुलाखतीला या असा मेसेज पाठवणे

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- मुलाखतीचे ठिकाण कंपनीऐवजी कोणतेतरी गाव किंवा तात्पुरते उभारलेले ऑफिस
- उमेदवाराकडून मुळ आधारकार्ड, शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेणे
- पाच-सहा गरजू जमा झाल्यावर गाडीत घालून लांबून कंपनी दाखविली जाते
- कंपनीसोबत करारासाठी दहा ते बारा हजारांची मागणी. पैसे मिळाले की गणवेश, बुटासाठी पुन्हा मागणी
- नोकरी नको असे म्हणणाऱ्यांना मूळ कागदपत्रे देण्यासाठी पैसे घेतले जातात
----------------------------
- नोकरी आणि प्रत्यक्षातील नोकरी यात प्रचंड तफावत असते. मध्यम किंवा लघू कंपन्यांना साहित्य पुरविणारा हा छोटा उद्योग असतो. पोस्ट मॅनेजरची; मात्र हमालीची कामे लावली जातात. कोणताही करार केला जात नाही. दहा ते बारा तास काम करावे लागते. भोजन व निवास व्यवस्था म्हणजे निकृष्ट जेवण
आणि एक साधी खोली असते. त्यामुळे एका महिन्यात हा जॉब सोडला जातो. आपण
फसलो आहोत या भावनेमुळे कोणी पोलिसात तक्रार करत नाही.
--------------------------------
ही घ्या काळजी...

- स्वत:ची शैक्षणिक पात्रता, कौशल्य पहा आणि पगार किती मिळू शकतो यावर
स्वत:लाच अजमावा
- सोशल मीडियावर फिरणाऱ्या किंवा कर्णोपकर्णी समजणाऱ्या नोकरी संधी माहितीवर विश्‍वास ठेवू नका
- थेट कंपनीची वेबसाईट पहा, एचआर विभागाशी मेलव्दारे संपर्क साधा
- नोकरी कोणत्याही मध्यस्थीमार्फत मिळविण्याचा प्रयत्न करू नका, तसेच
त्यासाठी पैसे देवू नका
-----------------------
अधिकृत नोकरी अशी मिळते...

- कोणतीही कंपनी कामगार भरतीसाठी त्यांचे अधिकृत संकेतस्थळ किंवा कंत्राटी कामगार पुरवठादार किंवा कॅम्पस इंटरव्हू याचा वापर करते
- कंपनी आवारात प्रशासन विभागाकडून कागदपत्रे तपासणी, मुलाखत आणि कौशल्य चाचणी, शारिरिक तंदुरूस्ती घेतली जाते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

- पगार, सुविधा याविषयी कागदोपत्री करार होतो. त्यासाठी इ-मेलचा वापर होतो. कोणताही व्यवहार तोंडी होत नाही
- नोकरीसाठी पैसे घेतले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT