पिंपरी-चिंचवड

लोणावळा-पौड मार्गावरील 'ही' खिंड पर्यटकांसाठी ठरते आर्कषण; मात्र...

भाऊ म्हाळसकर

लोणावळा (पुणे) : लोणावळा ते पौड मार्गावर लोहगड आणि दुधीवरे गावाजवळील खिंड ही दरडींमुळे धोकादायक ठरत आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या लोणावळा-पौड या रस्त्याचे रुंदीकरण होत असताना दुधीवरे खिंडीचे रुंदीकरण मात्र, लाल फितीतच अडकले आहे. सह्याद्रीच्या कुशीतून जाणारा लोणावळा, पवन मावळ आणि पौड यांना जोडणारा जूना मार्ग म्हणून हा रस्ता प्रसिद्ध आहे. पावसात धबधबे असलेले हे नेत्रदीपक दृश्य असल्यामुळे हे नेहमीच आकर्षण ठरते. एकीकडे लोहगड, विसापूर किल्ले आणि दुसरीकडे पवना धरणाचा अथांग जलाशय व अध्यात्मिक केंद्र असलेले प्रति पंढरपूर यामुळे मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी भेट देतात.

पवन मावळ किंवा मुळशीत जायचे असल्यास पुणे-मुंबई महामार्गाद्वारे कामशेतहून जाता येते. मात्र, मोठा विळखा पडत असल्याने अंतर वाढते. त्यामुळे दुधीवरे खिंडीतून पर्यायी मार्ग आहे. पवन मावळात अनेक धनदांडग्यांचे बंगले असल्याने त्यांच्यासह पवन मावळ, मुळशीतील अनेक नागरिकांचा या मार्गावर सतत राबता असतो. जेमतेम पंधरा ते वीस फुट रुंद आणि शंभर, दीडशे फुट उंच अजस्त्र खिंड प्रवास करताना विक्राळ उंचीमुळे अंगावर येते. येथून प्रवास करतानाही अंगावर काटा येतो. गेल्या काही वर्षांपासून खिंडीच्या माथ्याहून लहान-मोठ्या दरडी, राडारोडा रस्त्यावर येत असल्याने ही खिंड अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थांबण्यास बंदी... 

याठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना दुधीवरे खिंड आकर्षणाचे ठिकाण वाटते. याठिकाणी पर्यटक सेल्फी काढण्यासाठी वाहने घेऊन उभे राहत असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. दरडींचा धोका असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना याठिकाणी न थांबण्याचा इशारा देत याठिकाणी सेल्फीसाठी घेण्यास गेल्यावर्षी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बंदी घालत पर्यटकांनी पावसाळ्याचा आनंद घेण्याबरोबरच सावधगिरी बाळगण्याच्या सूचना केल्या होत्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पाहणी, पण...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्यांनीही अनेक वेळा या ठिकाणची पाहणी केली. मात्र, निधीची कमतरता आणि वनखात्याचा अडथळा, यामुळे रुंदीकरणाचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे. दुधीवरे खिंड व आसपासचा परिसर हा वन विभागाच्या अखत्यारीत येतो. दुसऱ्या बाजूला लोणावळा-पवनानगर-पौड रस्ता हा पीडब्ल्यूडीच्या कार्यक्षेत्रात येतो. धोकादायक दगड हटविणे हे पीडब्ल्यूडीचे काम आहे. रुंदीकरणात प्रामुख्याने वनविभागाचा मोठा अडथळा आहे. दरडींचा धोका असल्याने रुंदीकरण करत कायमस्वरुपी तोडगा काढवा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांतर्फे केली जात आहे, असे नागरिक कैलास शेळके यांनी सांगितले.

(Edited by : Shivnandan Baviskar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : पुणे जिल्ह्यात 3 लाख कुणबी नोंदी, जुन्नर- खेडमध्ये सर्वाधिक दाखले; मराठा आरक्षण जीआर आधीच आकडेवारी समोर

Asia Cup 2025 AFG vs HK : अफगाणिस्तानची विजयी सलामी, आशिया चषकाच्या पहिल्याच सामन्यात हाँगकाँगचा दारुण पराभव...

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द

Panchang 10 September 2025: आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘बुं बुधाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Education : राज्यात शिक्षणगळती चिंताजनक; इयत्ता नववी-दहावीतील ११.५ टक्के विद्यार्थी शिक्षणातून बाहेर

SCROLL FOR NEXT