PMPML bus
PMPML bus sakal
पिंपरी-चिंचवड

ई-तिकीट मशिन ठरतेय डोकेदुखी

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : धावत्या पीएमपीला ई-तिकीट मशिनच्या गोंधळामुळे वारंवार ब्रेक लागत आहे. जुन्या मशिन बदलून नवीन मशिन पीएमपीमध्ये कार्यरत झाल्या. परंतु, वाहकांना सध्या प्रत्यक्ष मार्गावर या मशिनच्या सुलभतेपेक्षा अडचणींचा सामना अधिक करावा लागत आहे. तिकीटमध्ये कॅश दिसत नसल्याने प्रवाशांसोबत हुज्जत घालण्याची वेळ वाहकांवर येत आहे. त्यामुळे वाहकांच्या खिशाला भुर्दंड बसण्याची दाट शक्यता आहे. तसेच ई तिकिटाची प्रिंट येण्यास विलंब होत असल्याने पीएमपी प्रशासनाला आर्थिक तोटा सहन होऊन वाहकांवरही या पैशाचा मानसिकरित्या ताण येत असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडच्या १३ डेपोसाठी २१ जूनपासून तीन हजारांवर मशिन वाहकांना देण्यात आल्या आहेत. तिकीट मशिनमध्ये रक्कम दिसणे क्रमप्राप्त आहे. त्यावरुन रकमेचे ठोकताळे बांधता येत आहेत. प्रवाशांना सुट्टे पैसे देताना जास्त पैसे जाण्याची शक्यता आहे. अशावेळी प्रवाशांबरोबर वाद उद्भवू शकतात. प्रवासी १००, २००, ५०० रुपये देवून ५ ते १० रुपयाची तिकिटे मागतात. नंतर गर्दीचा गैरफायदा घेऊन शंभर किंवा पाचशे रुपयाची नोट दिल्याचे वाहकांना सांगून बनवेगिरी करतात आणि पैसे लाटतात. त्यामुळे विकलेल्या तिकीटांचा जमा झालेल्या रकमेशी ताळमेळ घालणे वाहकांना अवघड होते. अन्यथा मार्गावर प्रवाशांबरोबर वाद झाल्यास मार्गावर कोणतीही सुविधा नाही. अशा प्रकारामुळे कॅशिअरकडून वाहकांवर कारवाई होण्याची भीती आहे.

तिकीट मशिनमधून तिकीट येण्यास विलंब होत असल्याने प्रवासी बसमधून उतरण्यापूर्वी तिकीट देणे अपेक्षित आहे. परंतु, प्रवासी थांबा आला तरीही तिकीट देणे कधी-कधी शक्य होत नाही. त्यामुळे वाहकांवर पेचप्रसंग उद्भवतो. अशावेळी पीएमपी स्थानकांवर तिकीट बुकिंग करण्याची कोणतीही सोय नाही. यामुळे प्रवासी फुकट प्रवास करण्याचे प्रमाण घडू शकते. पर्यायाने विनातिकीट प्रवासी आढळल्यास वाहकांवर कारवाई होऊ शकण्याची टांगती तलवार आहे.

काय सुविधा हवी

  • ई तिकीट मशिनमध्ये अपडाउनची सुविधा हवी

  • तिकीट स्पीडने निघणे आवश्यक आहे.

  • मशिन वजनास हलके हवे

  • कॅश मोजण्याची सुविधा हवी

  • वाहकांना मार्ग बदलण्याचा पर्याय मशिनमध्ये हवा

  • मशिनमध्ये तिकीट अडकल्यास तिकीट एरर पर्याय हवा

"एक टक्के ई मशिनमध्ये देखील बिघाड नाही. वाहकांची कोणाचीही तक्रार नाही. आधीच्या मशिनपेक्षा या मशिन निश्चितच चांगल्या आहेत. बॅटरी लाइफ, टच स्क्रीन व युजर फ्रेंडली आहेत. जीपीएस प्रणाली आहे. साठवण क्षमता आहे. मराठीतदेखील माहिती उपलब्ध आहे."

- चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएल

"तिकिटांमध्ये गोंधळ झाल्यास वाहकांवर विनाकारण चार्जशीट दाखल होण्याची भीती आहे. विनाकारण त्रास कर्मचाऱ्यांना होतो. वाहकाला प्रमाणिक काम करण्यासाठी प्रवाशाचे योग्य पद्धतीने पैसे देणे अपेक्षित आहे. तिकीट मशिनचा धक्का लागला तरीही सेन्सॉरमुळे तिकीट येत आहे. या त्रुटी दूर होणे आवश्यक आहे."

- सुनील नलावडे, सरचिटणीस, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT