पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये मृतांचा आकडा वाढतोय, दिवसभरात आज 'एवढ्या' जणांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्ण संख्या वाढतच आहे. शिवाय, मृतांची संख्याही वाढत आहे. काल 11 जणांचा मृत्यू झाला होता. आज आठ जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात रात्री आठ वाजेपर्यंत 488 रुग्ण आढळले. एकूण बाधितांची संख्या सहा हजार 644 झाली आहे. आज दिवसभरात 273 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वायसीएमसह आठ आणि खासगी आठ रुग्णालयांत कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 6644 झाली आहे. सध्या 2700 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 3849 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृतांची संख्या 95 झाली आहे. 

आज मृत्यू झालेल्या व्यक्ती नेहरूनगर पिंपरी (स्त्री, वय 82 व 60), चिंचवडेनगर चिंचवड (स्त्री, वय 80), पिंपरीगाव (पुरुष, वय 61), आनंदनगर चिंचवड स्टेशन (पुरुष, वय 42), इंद्रायणीनगर भोसरी (स्त्री, वय 46) आणि मोरे वस्ती चिखली (पुरुष, वय 47) येथील रहिवासी आहेत. 

सध्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, बीजे मेडिकल कॉलेज, राष्ट्रीय एड्‌स निर्मूलन व संशोधन संस्था अर्थात नारी आणि महापालिकेचे वायसीएम रुग्णालय यांच्यासह खाजगी सहा लॅबमध्ये कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणी केली जात आहे. त्यामुळे अधिक प्रमाणात व लवकर रुग्ण शोधले जाऊ लागले आहेत. दररोज सरासरी एक हजार स्वॅब तपासणी केली जात आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्‍यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी व सोबत किमान एक तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : माहिममधील सेंट झेवियर्स कॉलेज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT