Aaditya Thackeray Sakal
पिंपरी-चिंचवड

विजेवर चालणारी वाहने हेच आपले भवितव्य - उद्योगमंत्री सुभाष देसाई

इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (ता. १९) दुपारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (ता. १९) दुपारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आले.

तळेगाव स्टेशन - विजेवर चालणारी वाहने (Electric Vehicle) हेच आपले भवितव्य आहे. इंधनाचे (Fuel) दर महाग होत चालल्याने पेट्रोल डिझेलची (Petrol Diesel) वाहने परवडत नाहीत. वाढते प्रदूषण (Pollution) जगाची चिंता वाढवत आहे. त्यामुळेच विजेवर चालणारी वाहने उत्पादित करण्याचे महाराष्ट्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार संबंधित उद्योगांना आम्ही महाराष्ट्रात गुंतवणुकीस निमंत्रित करीत असलयाचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

इंग्लंडमधील कॉसिस ई मोबिलिटी या कंपनीच्या सुमारे तीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या, तळेगाव एमएडीसी टप्पा क्र. ०५ मधील आंबी मंगरुळ हद्दीतील, ७५ एकर क्षेत्रावरील नियोजित इलेक्ट्रिक बस उत्पादन प्रकल्पाचे कोनशिला अनावरण उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी (ता. १९) दुपारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन आणि दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, एमआयडीसी पुणे-१ चे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, इंग्लंडस्थित कॉसिस समूहाचे अध्यक्ष पीटर केन्झ, संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी राम तुमुलुरी, व्यवस्थापकीय संचालक रवी पंगा आणि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

तत्पूर्वी या महत्वाकांक्षी ई- बस उत्पादन प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी (ता.१९) सकाळी झाले. ठाकरे यांनी याप्रसंगी कंपनी व्यवस्थापनास शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर दुपारी झालेल्या कोनशिला अनावरण प्रसंगी बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई पुढे म्हणाले कि, इलेक्ट्रीक वाहनांच्या खरेदीला चालना देण्याहेतूने प्रत्येक वाहन खरेदीदारास राज्य शासनाकडून रोख अनुदान देण्यात येणार आहे.जेणेकरून ते अगोदरचे इंधनचलित वाहन सोडून देतील. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जबाबदारीतून उद्योग विभाग,पर्यावरण विभाग आणि वाहतूक विभागाच्या एकत्रितपणे संयुक्त असे ई धोरण असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेदृष्टीने ई-बस खरेदी करणाऱ्यास २० लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. सुटे भाग निर्मिती करणारे लघु, मध्यम उद्योजक यांना तळेगावातील या ई बस प्रकल्पामुळे फायदा होणार असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. शिवजयंतीच्या पवित्र मुहूर्तावर तळेगाव औद्योगिक क्षेत्रात होत असलेल्या ई बस उत्पादन प्रकल्पाच्या भूमिपूजन उपक्रमास देसाई यांनी शुभेच्छा दिल्या. येत्या एक नोव्हेंबरला तळेगाव प्रकल्पात उत्पादन झालेली ई-बस रस्त्यावर धावेल असे नियोजन असल्याची ग्वाही कंपनी व्यवस्थापनाने यावेळी दिली. गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र सरकारबरोबर सामंजस्य करार झालेल्या सदर प्रकल्पामुळे जवळपास दिड हजार जणांना रोजगार उपलब्ध होण्याची आशा आहे.

तळेगाव होणार भारताची ईव्ही कॅपिटल - डॉ. पी.अनबलगन

ई-बस उत्पदनाचा तीन हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा पहिल्या टप्प्यातील प्रकलप आहे. ऑटो हब, इलेकट्रॉनिक सिटी नंतर तळेगाव एमआयडीसी आता केवळ भारताची ईव्ही सिटीच नव्हे तर ईव्ही कॅपिटल होणार असल्याचा विश्वास एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.प्रकल्प व्यवस्थापनास शुभेच्छा देतानाच एमआयडीसी प्रशासन आणि राज्य शासन सर्वतोपरी साहाय्य करणार असलयाची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 3rd T20I : अखेर, सूर्यकुमार यादवने टॉस जिंकला! संजू सॅमसनसह तिघांना प्लेइंग इलेव्हनमधून केले बाहेर, बघा कोणाला मिळालीय संधी

Nashik Bank Fraud : बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता! जुन्या नाशिकमध्ये 'आरटीजीएस' फसवणुकीचा डाव उधळला

Rohit Pawar: लोकशाहीसाठी दंडुका हाथी घेऊ, आमदार रोहित पवार यांचा इशारा

Ichalkaranji Crime : अल्पवयीन मुलाचा इचलकरंजीत वडिलांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला

Nashik COVID ICU Scam : ३.३७ कोटींच्या फसवणूक प्रकरणी नाशिकमध्ये अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार; अडचणी वाढल्या

SCROLL FOR NEXT