पिंपरी-चिंचवड

कौतुकास्पद : कोरोनाशी लढण्यासाठी तरुण अभियंत्यानी बनवलं 'सॅनिशूटर', कसं काम करत वाचा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोविड-19 या विषाणूंमुळे जगातील दोनशे तीस देशांमध्ये कोरोना या प्राणघातक आजाराने हाहाकार माजविला आहे. यावर निगडी-प्राधिकरणातील तरुण अभियंता आदित्य आसबे याने उपाय शोधला असून 'सॅनिशूटर' हे मनगटी सॅनिटायझर बनवले आहे. 

दिवसेंदिवस जगात या आजाराचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढते आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारताचे स्थान झपाट्याने वरच्या दिशेने जात आहे. कोरोनावर रामबाण औषध किंवा लस अजूनपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोचलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोरोनासोबत जगण्याचा सल्ला दिला आहे. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सांगितलेल्या उपायांपैकी सॅनिटायझरने वारंवार हात स्वच्छ करणे हा एक प्रभावी उपाय आहे. उपजीविका आणि अन्य कामांसाठी घराबाहेर पडल्यावर सॅनिटायझरची बाटली सतत सोबत बाळगणे जिकिरीचे असते. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावर निगडी-प्राधिकरणातील आदित्य आसबे या तरुणाने दिसायला आकर्षक, वजनाला अतिशय हलके असे 'रिस्ट बॅण्ड'च्या स्वरूपातील मनगटाला बांधता येईल किंवा मनगटी घड्याळाला सहज जोडता येईल असे 'सॅनिशूटर' हे उपकरण निर्माण केले आहे. त्यामध्ये पंचवीस मिलीलिटर एवढे सॅनिटायझर भरले, की त्यातून तीनशे वेळा सॅनिटायझरचे सिंचन करता येते. सरासरी पाच दिवस हे द्रावण पुरते; आणि संपले की पुन्हा भरता येते. पर्यावरणाचा विचार करून सॅनिशूटर हे कमीतकमी प्लॅस्टिकचा वापर करून बनविण्यात आले आहे. यासाठी ओंकार मुळजे या मित्राने आदित्यला सहकार्य केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Edited by : Shivnandan Baviskar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT