student e sakal
पिंपरी-चिंचवड

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार अकरावीची पहिली फेरी राबविण्यात येत आहे. आरक्षित जागांवर प्रवेश निश्‍चित करण्यासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्याची पावती नसेल तरी ३० दिवस मुदतीचे हमीपत्र घेऊन प्रवेश द्यावेत, असे अकरावी प्रवेश समितीने स्पष्ट केले आहे. परिणामी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राबाबत विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (PCMC News)

पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार अकरावीची पहिली फेरी राबविण्यात येत आहे. शुक्रवारी पहिली गुणवत्ता यादी आणि महाविद्यालयांचे कटऑफ गुण जाहीर झाले. विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने (ता. ३०) ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्‍चित करावा लागणार आहे. पुणे विभागातून ३११ कनिष्ठ महाविद्यालयांत एक लाख ११ हजार २०५ जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या फेरीतील ५६ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी ३८ हजार ८५८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट जाहीर झाले. अकरावीची सर्व प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचे काही कागदपत्रे अपलोड करायची राहिले असतील, तर त्यांना त्यांच्या लॉगीनमध्ये जाऊन कागदपत्रे अपलोड करता येतील. कॉलेज लॉगीनमध्ये विद्यार्थ्यांनी अपलोड केलेली कागदपत्रे पाहता येणार आहेत.

...तर प्रवेश रद्द करणार

इतर मागासवर्गीय (ओबीसी), विशेष मागासवर्गीय (एसबीसी) भटक्या विमुक्त जाती व जमाती ( वीजेएनटी) च्या विद्यार्थ्यांना आरक्षणाधारित प्रवेश मिळाला असल्यास त्यांनी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे. अकरावी प्रवेश निश्‍चित करताना ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नाही, त्यांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची प्रत अथवा पावती अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. शनिवार व रविवारची सुट्टी विचारात घेता एनसीएलबाबत पुढील निर्णय घेण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पावती नसेल तरी ३० दिवसाच्या मुदतीत हमीपत्र घेऊन प्रवेश द्यावेत. या मुदतीत हे प्रमाणपत्र सादर केले नाही, तर प्रवेश रद्द केला जाणार असल्याचे अकरावी प्रवेश समितीने स्पष्ट केले.

पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक

पहिल्या यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालयात मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२ हजार ६६५ इतकी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. त्यांनी तातडीने प्रवेश निश्चित करावा. प्रवेश घेतला नाही तर, अन्यथा तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण होईपर्यंत त्यांना प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर राहावे लागेल. विशेष फेरी सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांची संमती नोंदविल्यानंतर प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे, असे केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे सदस्य सचिव तथा पुणे विभागाच्या सहायक संचालक मीना शेंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT