Seed 
पिंपरी-चिंचवड

शेतकऱ्यांना बसणार आर्थिक फटका ! शिरूर तालुक्यात सलग दुसर्‍या वर्षीही बियाणे निकृष्ट

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे - शिरूर तालुक्यात सलग दुसर्‍या वर्षीही बाजरी बियाणे निकृष्ट निघाल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले असून, निकृष्ट बियाणामुळे शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक फटका बसणार आहे. कृषी खात्याने निकृष्ट बियाणांची पाहणी करून संबधित कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिरूर तालुका अध्यक्ष श्री सुनील हिंगे  यांनी केली आहेे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई ,गणेगाव खालसा ,वाघाळे, पिंपरी दुमाला , खंडाळे, निमगाव म्हाळुंगी आदी  २० गावातील शेतकऱ्यांचे बाजरी बियाणांची उगवण क्षमता अत्यल्प असून अनेक गावातील शेतात ते  उगवलेच नसल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचयातीकडे शेतकऱ्यांनी केली असल्याचे श्री हिंगे यांनी सांगितले. 

याबाबत सालाबादप्रमाणे बियाणे वितरकांची तपासणी कृषी विभागाने करणे अपेक्षित होते, परंतु तालुक्यातील ठराविक बियाणे वितरकांची तपासणी करून नमुना बियाणे घेतले असले तरी निकृष्ट बियाणे पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी बाजरी बियाणे निकृष्ट निघाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने बियाणे कंपन्या निकृष्ट बियाणी शेतकऱ्यांच्या माथी मारत असून मागील वर्षीहि निकृष्ट बियाण्यांमुळे बाजरी  उगवली नाही व त्याचे पंचनामे होऊनही कोणत्याहि शेतकऱ्यांना अहवाल मिळाला नाही. संपूर्ण शिरूर तालुक्यातील बियाणे व खते विक्रेत्यांची तपासणी करून निकृष्ट दर्जाचे बियाणे विक्री करणाऱ्या कंपनीवर त्वरित  कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री हिंगे यांनी केली आहे. 

तशेच निकृष्ट बियाना संदर्भात  कृषी सचिवांना निवेदन देणार असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका सचिव देवेंद्र सासवडे यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT