पिंपरी : मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून एटीएममधून ५९ हजार रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.
याप्रकरणी रघुनाथ शंकर पाटील (वय ७७, रा. पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे १४ ऑक्टोबरला पिंपळे गुरव येथील एसबीआय बँकेत पासबुकवर नोंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी भामट्याने मिनी स्टेटमेंट काढून देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचे एटीएम घेऊन मिनी स्टेटमेंट काढून दिले. मात्र, एसबीआय बँकेचे जयंतीलाल गोहिल या नावाचे एटीएम आरोपीने पाटील यांना दिले. त्यानंतर आरोपीने पाटील यांच्या एटीएम कार्डचा वापर करून ५९ हजार २०० रुपये काढून घेत फसवणूक केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सांगवीत महिलेची एक लाखांची फसवणूक
महिलेच्या खात्यावरून अनोळखी व्यक्तीने पैसे काढून घेत एक लाख १२ हजारांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना सांगवी येथे उघडकीस आली. याप्रकरणी नीता रावसाहेब साठे (रा. सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या बँकेच्या खात्यातून दहा ते १५ ऑगस्ट या कालावधीत आरोपीने वेळोवेळी एक लाख १२ हजार ४०० रुपये बँक खात्यावरून काढून घेत ऑनलाइन फसवणूक केली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मोशीमध्ये दुकानदारसह कामगाराला मारहाण
दुकान खाली करण्याची धमकी देऊन दुकानदार व कामगाराला मारहाण केली. ही घटना मोशी येथे घडली. याप्रकरणी गणेश ढगलाराजमजी प्रजापती (वय २९, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामलाल रुपारामजी चौधरी (वय ५८), प्रवीण रामलाल चौधरी (वय २८, दोघे रा. संतनगर, मोशी) यांच्यासह एका महिलेला अटक केली आहे. तर दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांचे मोशी येथील गोदाम चौकात स्वीटचे दुकान असून शनिवारी (ता. १६) रात्री साडे नऊच्या सुमारास ते दुकानात असताना आरोपींनी त्यांना दुकान खाली करण्याची धमकी दिली. फिर्यादीने दुकान खाली न केल्याने आरोपींनी दुकानामध्ये घुसून मोठमोठ्याने आरडाओरडा करून फिर्यादी व त्यांच्या कामगारांना शिवीगाळ केली. फिर्यादी व त्यांचा कामगार कृष्ण गोपाल शर्मा यांना खुरपे, चमचा व बांबूने आरोपींनी मारहाण करून जखमी केले.
वाकडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम बाप अटकेत
अकरा वर्षीय मुलीवर बापानेच लैंगिक अत्याचार केले. याबाबत पत्नीने जाब विचारला असता आरोपीने तिला व तिच्या मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. ही घटना वाकड परिसरात घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४५ वर्षीय बापाला अटक केली आहे. आरोपी बापाने त्याच्या अकरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. यास विरोध केला असता मुलीला मारहाण केली. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्याने तिने पतीला विचारणा केली. त्यानंतर आरोपीने पत्नी व पीडित मुलीला मारहाण करीत ‘तू जर कोणाला काहीही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना मारून टाकेल’ अशी धमकी दिली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.