Corona-Affected 
पिंपरी-चिंचवड

दिलासादायक! तळेगावातील पहील्या कोरोना बाधित महिलेचा फाॅलोअप चाचणी अहवाल निगेटीव्ह

सकाळवृत्तसेवा

तळेगाव स्टेशन - तळेगावातील पहील्या कोरोना बाधित महीला परिचारिकेचा फाॅलोअप कोविड-१९ चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.तसेच माळवाडीतील दुस-या कोरोना बाधित परिचारिकेच्या संपर्कातील पती आणि दोन्ही मुलांचे चाचणी अहवालही मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी दिली. यामुळे माळवाडीसह तळेगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

तळेगावचे वैदयकीय अधिकारी डाॅ प्रवीण कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणी अहवाल पाॅझिटीव्ह असला तरी कुठलीही भौतिक लक्षणे न आढळलेल्या मावळातील पहील्या कोरोना बाधित महीलेला ७ मे रोजी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्या परिचारिकेने कुठल्याही विशेष उपचारांशिवाय प्रबळ रोगप्रतिकारक शक्तीने कोरोनावर मात केली आहे. तिचा फाॅलोअप रिपोर्ट मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे सध्या तरी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही.

लगतच्या माळवाडीत आढळलेल्या दुस-या कोरोना बाधित महीला परिचारिकेवर शनिवारपासून (ता.०९) पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. मात्र, जवळच्या संपर्कातील तिचा पती आणि दोन मुलांचे कोविड चाचणी अहवाल मंगळवारी (ता.१२) रात्री निगेटीव्ह आले आहेत.

पहील्या रुग्णाच्या संबंधित तळेगाव स्टेशनच्या ३८ जणांसह माळवाडीतील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २४ जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर माळवाडीतील ६० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलयाचे डाॅ.कानडे यांनी सांगितले.

मंगळवारी (ता.१२) रात्री उशीरा आलेल्या या अहवालांमुळे तळेगावसह माळवाडीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोना प्रतिबंधासाठी तळेगावातील नागरिकांसह प्रशासनाकडून पुरेसी खबरदारी घेतली जात असली तरी, चोरीछुपे बाहेरील प्रतिबंधीत क्षेत्रातून तळेगावात ये जा करणा-यांमुळे संसर्गाच्या धोक्याची टांगती तलवार कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT