पिंपरी-चिंचवड

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडचे माजी विरोधी पक्षनेता, विद्यमान नगरसेवकालाही कोरोना

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता व विद्यमान नगरसेवकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे गुरुवारी आढळून आले. चिंचवड परिसरातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

माजी विरोधी पक्षनेते असलेले नगरसेवक भोसरी विधानसभा मतदारसंघातील आहेत. आक्रमक व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा आहे. लॉकडाउन कालावधीत त्यांनी अनेक नागरिकांना मदत केली आहे. अन्नधान्यांचे किट वाटप केले आहेत. त्यामुळे त्यांचा नागरिकांशी संबंध आला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना त्रास होऊ लागल्याने ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

आजपर्यंत दोन लोकप्रतिनिधींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेले नगरसेवक आणि यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेचा समावेश आहे. या नगरसेविकेच्या  पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे पती माजी नगरसेवक आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal to Hubli Highway Closed : कागल ते हुबळी महामार्ग बंद, कोल्हापूर आयजी रंजनकुमार शर्मा यांनी सांगितला पर्यायी मार्ग; शेतकरी संघटनांची भूमिका काय?

ट्रम्पना पती म्हणाली नवी प्रेस सेक्रेटरी, चूक लक्षात येताच केली मिश्किल टिप्पणी; VIDEO VIRAL

Maharashtra Live News : "मी कोणतंही बटण दाबलं नाही!" एअर इंडियाच्या वैमानिकाचा दावा

Pune IT Engineers Viral Story : महिन्याला १ लाखांहून अधिक पगार, तरी वीकेंडला रॅपिडो चालवतात; पुण्यातील IT इंजिनिअर्सची कमाई पाहून वाटेल आश्चर्य

दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवणार, आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT