Housing sakal
पिंपरी-चिंचवड

घर विक्रीच्या नावाने फसवणूक

आणखी एक प्रकार उघड; निगडी, तळेगाव दाभाडे ठाण्यात गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : घरकुल-चिखली येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत व्हीआयपी कोट्यातून घर देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी तळेगाव दाभाडे येथीलही नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आबासाहेब वसंतराव भोसले (वय ४९, रा. लेक पॅराडाईज सोसायटी, तळेगाव दाभाडे) व योगेश विठ्ठल ढोले (वय ३१, रा. मांजरी, पुणे, मूळ-सांगली) अशी निगडी ठाण्यात गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी घर देण्याचे आमिष दाखवून रवींद्र शिंदे, साक्षीदार संतोष सुदाम चव्हाण, गोरखनाथ विठोबा गावंड, प्रवीण गावडे, बबन लोंबाटे आदींकडून सात लाख ६२ हजार रुपये घेतले. मात्र, घर व गाळा न देता त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात भोसले याच्याकडून एक लाख; तर ढोले यांच्याकडून तीन लाखांची रोकड पोलिसांनी जप्त केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपी आबासाहेब भोसले याच्यावर तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला. (Pcmc News)

किरण मधुकर साबळे (रा. सीआरपीएफ कॅम्प, तळेगाव दाभाडे) यांना व त्यांच्या भावाला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत घर मिळवून देण्याचे आमिष आरोपीने दाखवले. साबळे यांच्याकडून ९६ हजार रुपये घेतले. वैशाली सातकर यांच्याकडून एक लाख पाच हजार, पुरुषोत्तम राऊत, सीमा गायकवाड, देढे यांच्याकडून वेगवेगळ्या रकमा घेतल्या, तर लक्ष्मी नारायण राऊत यांच्याकडूनही ६० हजार घेतल्याचे समोर आले. या आरोपीने तळेगाव येथील प्रकरणात एकूण दोन लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

कागदपत्रे नष्ट करण्याचा प्रयत्न

या गुन्ह्यातील महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करण्यासाठी आरोपीची पत्नी सपना भोसले हिने सर्व कागदपत्रे नातेवाइकाला दिले. मात्र, पोलिसांनी सापळा रचून देहूरोडमधील सेंट्रल चौकात नातेवाइकांची रिक्षा अडवली. त्यामध्ये माऊली विजय गलांडे व निशा गलांडे (रा. वडगाव शेरी) हे होते. त्यांच्याकडील बॅगमध्ये सांगली जिल्ह्यातील ढालगाव ग्रामपंचायत, रांजनीतील चिकित्सा अधिकारी ग्रामीण रुग्णालय, नेहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोपायटर आदींचे बनावट रबरी शिक्के व शाई पॅड सापडले. यासह आरोपी भोसलेची वैयक्तिक कागदपत्रांच्या प्रती, इतर काही लोकांच्या ओळखपत्रांच्या प्रती व तीनशे लोकांची नावे, त्यांच्या नावासमोर काही रक्कम, फ्लॅट नंबर लिहिलेले आढळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Fare Hike: बसमधून प्रवास करणे महागणार! प्रवासात खिसा रिकामा, मिरा-भाईंदर पालिकेचा बस भाडेवाढीचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

SCROLL FOR NEXT