friend attacked by Cutter on neck due to love affairs in Bhosari 
पिंपरी-चिंचवड

भोसरीत प्रेमप्रकरणातून मित्रावर कटरने वार 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : प्रेमसंबंधाच्या कारणावरून एकाने मित्रावर प्राणघातक हल्ला केला. गळ्यावर कटरने वार केल्याने मित्र गंभीर झाल्याची घटना भोसरी येथे घडली. 

अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर किरण शिवाजी थोरात (वय 23, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुभम मधूकर कांबळे (वय 20, रा.बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थांबा! हेल्मेट घाला, प्रवासाला निघा; कऱ्हाड पोलिसांचे आहे लक्ष

शुक्रवारी (ता.1) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास जखमी अभिषेक आणि त्याचा आरोपी मित्र किरण हे दोघेजण अभिषेक याच्या दुचाकीवरून भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणीनगरकडून बालाजीनगरकडे जात होते. त्यावेळी प्रेमसंबंधाच्या कारणावरून किरण याने अभिषेक याचा कटरने गळा कापला. यामध्ये अभिषेक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी किरण याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची रणनीती काय? 1700 पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; आज काय घडणार?

Jalgaon Ganeshotsav: मानाच्या गणपतीची यंदा थाटात होणार प्रतिष्ठापना; महापालिकेत समिती स्थापन; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

Jalgaon Farmer Crisis: आठ महिन्यांत ९९ शेतकऱ्यांनी कवटाळले मृत्यूला; जिल्ह्यातील सत्र थांबता थांबेना; ४८ कुटुंबांना मदत, २२ प्रस्ताव नामंजूर, १८ प्रलंबित

Maharashtra Monsoon Prediction : मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारला थेट इशारा, ‘मुंबईचा बी प्लॅन’ तयार

Chakan Traffic Jam: चाकणमध्ये वाहतुकीचा बोजवारा; माणिक चौकात बेकायदा पार्किंग, रस्त्यावर बाजार, नागरिक त्रस्त

SCROLL FOR NEXT